PM Narendra Modi  Saam Digital
देश विदेश

PM Narendra Modi : मला तिसऱ्या टर्मसाठी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता, पण...; PM नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

BJP National Convention : माझ्या दुसऱ्या कार्यकाळात एका जुन्या विरोधी नेत्याने तुम्ही आता विश्रांती घ्या, असे सांगितले होते. मी म्हणालो की आम्ही राजकारणासाठी नाही तर राष्ट्रीय धोरणासाठी काम करतो. आम्ही शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालतो. सत्ता उपभोगण्यासाठी मी तिसरी टर्म मागत नाही, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Sandeep Gawade

PM Narendra Modi

दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्यकर्त्यांना संबाधित केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराचा दाखला देत त्यांनी राष्ट्रनिर्मितीचं स्वप्न समोर ठेवलं आणि राष्ट्रनिर्मितीसाठी पुढचे 100 दिवस नवीन उर्जा, नवा उत्साह, नवा आत्मविश्वास आणि नव्या उमेदीनं काम करण्याचं आवाहन केलं. दरम्यान मोदी यांनी अधिवेशनाला संबोधित करताच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.

10 वर्षांचा सदोष कार्यकाळ आणि 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणं सामान्य गोष्ट नव्हती. देश भ्रष्टाचार आणि दहशतवादापासून मुक्त झाला आहे. माझ्या दुसऱ्या कार्यकाळात एका जुन्या विरोधी नेत्याने तुम्ही आता विश्रांती घ्या, असे सांगितले होते. मी म्हणालो की आम्ही राजकारणासाठी नाही तर राष्ट्रीय धोरणासाठी काम करतो. आम्ही शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालतो. सत्ता उपभोगण्यासाठी मी तिसरी टर्म मागत नाही, तर राष्ट्रासाठी सत्तेत असल्याचं ते म्हणाले.

मोदींच्या भाषणातील काही ठळक मुद्दे

18 फेब्रुवारी आहे आणि या काळात 18 वर्षांचे झालेले तरुण देशाच्या 18 व्या लोकसभेसाठी निवडून येणार आहेत.

पुढील 100 दिवस प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ, परंपरा या सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे.

गेल्या 10 वर्षात मिळालेलं यश आणि गती अभूतपूर्व आहे.

देशातील जनताच हे जग मोठ्या उत्साहाने सांगत आहे. आता देश मोठे संकल्प आणि मोठी स्वप्ने पाहणार आहे.

हा संकल्प भारताला विकसित करण्याचा आहे, ज्यामध्ये पुढील पाच वर्षे महत्त्वाची आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अयोध्येत 5 शतकांची प्रतीक्षा संपली

भाजपच्या अधिवेशनात देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला संकल्प अधिक दृढ करणासंदर्भात चर्चा झाली.

सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भाजप सरकारचे जोरदार पुनरागमन आवश्यक आहे.

विरोधी पक्षनेतेही एनडीएला 400 जागा मिळणार असल्यांचं बोलत आहेत.

यासाठी भाजपला 370 चा टप्पा पार करावा लागणार आहे.

अयोध्येत 5 शतकांची प्रतीक्षा संपली.

जम्मू-काश्मीर कलम 370 मधून मुक्त झाले

लोकसभा/विधानसभेत महिला आरक्षण देण्यात आले.

विरोधकांकडे खोटी आश्वासनं देण्याशिवाय काही उरलं नाही

केवळ भाजप आणि एनडीएच विकसित भारताचं आश्वासन देऊ शकतं.

तिसऱ्या टर्ममध्ये भारताला सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचा संकल्प केला आहे.

पूर्वी सत्तेत असलेल्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केले आणि पदोन्नती दिली.ही परंपरा आम्ही बदलली आहे.

काँग्रेस ही भ्रष्टाचार, तुष्टीकरण आणि अस्थिरतेची जननी आहे. त्यात ना विकासाचा अजेंडा आहे ना भविष्य. भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर देशाचे विभाजन करण्यात गुंतले आहेत. ते लष्कराचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT