Happy Birthday PM Modi  Saam Tv
देश विदेश

Happy Birthday PM Modi: गुजरातचे मुख्यमंत्री ते जगातील प्रभावशाली नेते! PM मोदींचा आज वाढदिवस; देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

Pm Narendra Modi 73th Birthday: देशाचे लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. पंतप्रधान मोदी आज आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Gangappa Pujari

PM Narendra Modi Birthday:

देशाचे लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. पंतप्रधान मोदी आज आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाजपकडून २ ऑक्टोंबरपर्यंत सेवा सप्ताह राबवला जाणार आहे.

17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील (Gujrat) वडनगर येथे नरेंद्र मोदी यांचा झाला. एका सामान्य कुटुंबात जन्मलेले पंतप्रधान मोदी (Narendra Modi) आज जगातील सर्वात प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. RSS चे प्रचारक म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कार्याची सुरूवात झाली. हळूहळू ते भाजप आणि आरएसएसचे नेते म्हणून उदयाला आले.

२०१४ मध्ये पंतप्रधान होण्यापुर्वी नरेंद्र मोदी २००१ ते २०१४ याकाळात जवळपास १२ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आहेत. सोशल मीडियावर सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली नेत्यांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले जाते.

देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

भाजप (BJP) पंतप्रधान मोदींचा वाढदिवस सेवा सप्ताहचे आयोजन करून साजरा करणार आहे. या कालावधीत पक्ष घटकांकडून विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील. तसेच पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी विश्वकर्मा जयंतीही आहे. या निमित्त पंतप्रधान मोदींनी विश्वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालय पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'आयुष्मान भव' कार्यक्रम सुरू करणार आहे. शासनाच्या आरोग्य योजना समाजाच्या शेवटच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा कार्यक्रम असेल. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली.

शुभेच्छांचा वर्षाव...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केंद्री मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देताना "तुम्ही निरोगी राहा आणि दीर्घायुष्यी व्हा. तुमच्या नेतृत्वाखाली देशातून भय, भूक आणि भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होईल आणि पुन्हा एकदा विश्वगुरूचे स्थान प्राप्त होईल, हीच सदिच्छा; असा संदेश दिला आहे.

तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "पीएम मोदींनी भारताला केवळ नवी ओळखच दिली नाही, तर जगभरात आपली प्रतिष्ठाही वाढवली आहे. सार्वजनिक कल्याण आणि गरीबांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असलेल्या मोदीजींनी भारताला विकासाच्या नव्या उंचीवर नेले आहे,त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असा संदेश त्यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

Election Commission :...नाही तर माफी मागावी लागेल; निवडणूक आयोगाची राहुल गांधींना ७ दिवसांची डेडलाईन

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

SCROLL FOR NEXT