Rahul Gandhi Attacks NDA in Lok Sabha google
देश विदेश

Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींचं मेक इन इंडिया चांगलं होतं, पण...; लोकसभेत राहुल गांधींची शेलक्या शब्दात टीका

Rahul Gandhi Attacks NDA in Lok Sabha: लोकसभेत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी एनडीए सरकारला खडेबोल सुनवालेत. मेक इन इंडिया उपक्रमात पंतप्रधान मोदी अपयशी ठरल्याचं राहुल गांधी म्हणाले.

Bharat Jadhav

संसदेच्या अर्थसंकल्पाच्या सत्रात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चा झाली. राहुल गांधींनी एनडीए सरकारला शेलक्या शब्दात सुनावलंय. एनडीए सरकारचाच डाव त्यांच्यावर टाकत राहुल गांधींनी मोदी सरकाराला चीतपट केलंय. देशातील बेरोजगारीवरून एनडीए सरकारला घेरताना राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदींनी सुरू केलेला मेक इन इंडिया उपक्रम चांगला होता,असं म्हणत त्यांनी कौतुक केलं. पण उपक्रम चांगला राहुनही उपयोग झाला नाही.

देशातील बेरोजगारी कमी झाली नाहीये. युपीए सरकार असेल किंवा एनडीए सरकार असेल पण बेरोजगारी कमी झाली नसल्याचं राहुल गांधी म्हणालेत. देशात मागील ६० वर्षात सर्वात कमी इंफ्रास्टक्चर झालंय. या प्रश्नांचं उत्तर काय आहे. देशातील युवकांना काय सांगाल? असा सवाल देखील राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना केलाय. मेक इन इंडियाबद्दल पंतप्रधान जे बोलले ते चांगलेच आहे. पण उत्पादनात अपयश येतय. आपण पंतप्रधानांना दोष देत नाहीत. पंतप्रधानांनी त्यासाठी प्रयत्न केला, कल्पना योग्य होती पण ते अपयशी ठरले, असं राहुल गांधी म्हणालेत.

कोणताही देश उपभोग आणि उत्पादन या दोन गोष्टींवर चालतो. 1990 पासून सर्व सरकारांनी उपभोगावर चांगले काम केलंय. रिलायन्स, अदानी, टाटा, महिंद्रा या सर्वांचा झपाट्याने विकास झाला पण एकूणच देशाचा विकास झाला नाहीये. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून बोलतांना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले राष्ट्रपतींचे भाषण ऐकले. ते अनेक वर्षांपासून ऐकतोय. यात एकच होती ती म्हणजे आम्ही हे केलं ते केलं. पण युपीए किंवा एनडीए सरकारला तरुणांना रोजगार देण्यात आजतागायत यश आले नसल्याचं राहुल गांधी म्हणाले.

राष्ट्रपतींच्या भाषणात बेरोजगारीचा मुद्दा नव्हता. युपीए सरकार असो किंवा एनडीए सरकार असो, दोन्ही सरकारकांकडे बेरोजगारी का अजून आहे, या प्रश्नाचं उत्तर नाहीये. पंतप्रधान मोदी मेक इन इंडिया यावर जे म्हणाले ते चांगलेच आहे, ती चांगली आयडिया आहे, पण उत्पादनात मात्र अपयशी ठरली. देशातील आर्थिक स्थितीबाबत राहुल गांधी म्हणाले, मागील ६० वर्षात आपण उत्पादनात सर्वात खालच्या स्तरावर आहोत. भर लोकसभेत फोन दाखवताना राहुल गांधी म्हणाले, हा फोन भारतात बनतो, पण याचे काही पार्ट हे चीनमध्ये मागवले जातात. त्यानंतर हा फोन भारतात असेंबल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT