Rahul Gandhi: आधी डोळे काढले, हात-पाय बांधलेले, ३ दिवसांनी सापडला तरुणीचा मृतदेह; अयोध्येतील प्रकारानंतर राहुल गांधींचा संताप

BJP government criticism: अयोध्येत घडलेल्या घटनेवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली आहे. तसेच सोशल मीडियावर पोस्ट करत घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
Rahul Gandhi on Ayodhya
Rahul Gandhi on AyodhyaSaam Tv News
Published On

अयोध्येत एका तरूणीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे. तरूणीच्या हत्येनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या घटनेचा निषेध करत काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली आहे. तसेच सोशल मीडियावर पोस्ट करत घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांनी अयोध्येत घडलेल्या घटनेला लज्जास्पद म्हटलंय. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत मुलीवर घडलेल्या लैंगिक अत्याचारावर निषेध व्यक्त केला आहे.

Rahul Gandhi on Ayodhya
PPF investment benefits: दररोज फक्त १०० रूपये गुंतवा अन् १० लाख मिळवा, सरकारी योजनेमुळे व्हाल मालामाल

राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, 'तीन दिवसांपासू मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या मदतीच्या हाकेकडे प्रशासनाने लक्ष दिले असते, तर कदाचित तिचे प्राण वाचू शकले असते. आणखीन एका अपराधामुळे एका मुलीचा मृत्यू झाला आहे. अजून किती दिवस आणि किती कुटुंबियांना जाच सहन करावा लागेल आणि मदतीसाठी प्रतिक्षा करावी लागेल?' असा सवाल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उपस्थित केला आहे.

त्यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले की, बहुजन विरोधी भाजप राजवटीत विशेषत: उत्तर प्रदेशात दलितांवरील घृणास्पद अत्याचार, अन्याय आणि हत्येचे प्रमाण वाढत आहे. उत्तर प्रदेश सरकारने या गुन्ह्याची तातडीने चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि जबाबदार पोलिसांवर कठोर कारवाई करावी. कृपया नेहमीप्रमाणे पीडित कुटुंबाला त्रास देऊ नका. देशातील मुली आणि संपूर्ण दलित समाज तुमच्याकडे न्यायासाठी पाहत आहे', असं पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय.

Rahul Gandhi on Ayodhya
Budget 2025: १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट, तरी ४-८ लाख रूपयांवर कर का? संपूर्ण गणित समजून घ्या

नेमकं प्रकरण काय?

अयोध्येत तीन दिवसांपासून एक मुलगी बेपत्ता आहे. ही मुलगी १० वाजता धार्मिक कार्यक्रमाला जात असल्याचं सांगत घरातून निघाली. मात्र ती घरी परतलीच नाही. कुटुंबियांनी मुलगी हरवली असल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडल्याचे कुटुंबियांना सांगितले. तिचे डोळे काढले, हाता - पायांना दोरी बांधली होती. तसेच चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या. शरीरातील काही भागातील हाडं तुटली होती. मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com