Ahmedabad Saam
देश विदेश

Ahmedabad Plane crash: मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन अन् बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी दाखल, रूग्णालयातही देणार भेट

Air India Plane Crash in Ahmedabad: गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातस्थळाची पाहणी केली.

Bhagyashree Kamble

गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाचा भीषण अपघात घडला. या अपघातात आतापर्यंत २६५ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विमानात २४२ प्रवासी, दोन पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते. हे विमान अहमदाबादहून लंडनला (गॅटविक) जाणार होते. उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, तसेच अनेक भारतीय आणि परदेशी प्रवाशांचा मृत्यू झाला. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विमान अपघातातील पीडितांच्या कुटुंबाची भेट घेतली. तसेच परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. या अपघातानंतर त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान गुरूवारी दुपारी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांत येथील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. या अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विमानात २४२ जण होते. ज्यात २ पायलट आणि १० क्रू मेंबर होते. दरम्यान, विश्वास कुमार रमेश नावाचा प्रवासी या भीषण अपघातानंतर बचावला. तो एअर इंडियाच्या विमानात ११ A सीटवर बसला होता.

एअर इंडियाच्या माहितीनुसार, विमानात असलेल्या २३० प्रवाशांपैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज नागरिक होते. विमानात असलेल्या इतर १२ जणांमध्ये २ पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते.

दरम्यान, विमान अपघातात काही मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला आहे. डीसीपी कानन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार,विमान डॉक्टरांच्या वसतीगृहात धडकले. वसतीगृहात काही विद्यार्थी जेवायला बसले होते. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. म्हणजेच एकूण २६५ लोकांचा विमान अपघातात हाकनाक बळी गेला.

या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमधील मेघानी परिसरात अपघातस्थळी पोहोचले आहेत. अपघातस्थळाची पाहणी आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन ते या घटनेसंदर्भात बैठक घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT