PM narendra Modi in hisar saam tv
देश विदेश

PM Modi : इतकं प्रेम आहे तर एखाद्या मुस्लिम व्यक्तीला अध्यक्ष करा, PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

PM Narendra Modi in Hisar : काँग्रेसला जर मुस्लिम समाजाप्रति इतकं प्रेम आहे, तर एखाद्या मुस्लीम व्यक्तीला पक्षाचे अध्यक्ष का करत नाहीत? निवडणुकांमध्ये मुस्लिमांना अर्ध्या जागांवर तिकीट का दिलं जात नाही? असा थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

Nandkumar Joshi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसनं सत्तेसाठी संविधानाचा नेहमीच शस्त्र म्हणून वापर केला, असा आरोप मोदी यांनी हरयाणाच्या यमुनानगरमधील एका सभेला संबोधित करताना केला.

काँग्रेसने मुस्लिमांच्या तुष्टीकरणासाठी वक्फ अॅक्टमध्ये २०१३ मध्ये दुरुस्ती केली होती. निवडणूक जिंकण्यासाठी काही महिन्यांपूर्वी असंच केलं. जर काँग्रेसला मुस्लिमांबद्दल इतकं प्रेम वाटतं, तर एखाद्या मुस्लीम व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष का करत नाहीत, असा थेट सवालही मोदींनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरयाणातील सभेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून मुस्लिमांना अर्धी तिकीटं का दिली जात नाहीत? असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपली सत्ता कायम राहावी यासाठी काँग्रेसने आणीबाणीच्या काळात संविधानाच्या भावना पायदळी तुडवल्या. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि समानतेच्या भावनेतून काम व्हावे. सगळ्यांसाठी एकसारखीच न्याय संहिता असावी, ज्याला मी सेक्युलर सिव्हिल कोड म्हणतो. पण काँग्रेसने ते कधीही लागू केले नाही, याकडंही पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधलं.

उत्तराखंडमध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर सेक्युलर सिव्हिल कोड लागू करण्यात आलं. पण देशाचं दुर्दैवं बघा की संविधान खिशात घेऊन फिरणारे लोक त्याचा विरोध करतात, असा टोला मोदींनी राहुल गांधींचं नाव न घेता लगावला. काँग्रेसच्या सरकारने कर्नाटकात टेंडरमध्येही धर्माच्या आधारे आरक्षण दिलं. त्याची संविधानात तरतूदही नाही, असंही मोदी म्हणाले.

जर मुस्लिमांबद्दल इतकं प्रेम आहे तर काँग्रेस त्यांच्या एखाद्या नेत्याला पक्षाचा अध्यक्ष का करत नाही? निवडणुकांमध्ये अर्ध्या जागांवर तिकीटं का दिली जात नाहीत, असे सवाल त्यांनी केले. या लोकांना कुणाचीच पर्वा नाही. गरीब मुस्लिमांना त्रासदायक ठरणारे निर्णय ते घेतात. वक्फ अॅक्टबाबतही तेच झालं होतं. कट्टरपंथी मुस्लिम आणि श्रीमंतांनाच वक्फ बोर्डावर वर्चस्व मिळालं. आता नव्या कायद्यानं सर्व खूश आहेत, असंही मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT