पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना संदेश दिला.  saam tv
देश विदेश

पंतप्रधान मोदींचा मध्यरात्री विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेश; मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

pm modi student video message paper leak : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसाठी आज मध्यरात्री व्हिडिओ संदेश दिला. पेपरफुटी हे काही साधारण प्रकरण नाही. गेल्या अडीच महिन्यांत पेपरफुटी प्रकरणांमध्ये सरकारने अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत, असे मोदी म्हणाले. याशिवाय आज, शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

Nandkumar Joshi

नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना संदेश दिला. पेपरफुटी हे काही साधे प्रकरण नाही. आज, शुक्रवारी या प्रकरणात यापेक्षा मोठी आणि कठोर कारवाई होईल, असे ते म्हणाले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी व्हिडिओ पोस्ट केला. पेपरफुटी प्रकरणात संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या संदर्भात आजच्या कॅबिनेट बैठकीत चर्चा देखील होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींनी व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, पेपर लीक हा काही साधा विषय नाही. यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना खूपच त्रास होतो. गेल्या अडीच महिन्यांत या घटनांनंतर सरकारने अनेक पावले उचलली आणि दोषींना अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये ही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी कमीत कमी कालावधीत जवळपास २२ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली. १९ तारखेला परीक्षेचे निकालही जाहीर करण्यात आले आहेत. देशभरातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या आनंदाच्या बातम्या समोर आल्या आहेत, असेही मोदी म्हणाले.

सरकार केवळ याच कारवाईने समाधानी होणार नाही. आज यासंबंधित विभागांना पेपर लीक प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. विभागांकडून निरंतर मेहनत करून त्याचा मसुदा तयार करून आमच्याकडे सोपवण्यात आला आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

या प्रस्तावात फास्ट ट्रॅक कोर्ट, तसेच दोषींना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या मसुद्यावर शुक्रवारी कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. मंत्र्यांनी सूचवल्याप्रमाणे अंतिम स्वरुप दिले जाणार आहे. सोमवारपासून संसदेच्या दुसऱ्या आठवड्याची कार्यवाही सुरू होणार आहे. सरकार लवकरात लवकर हे विधेयक संसदेत मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आश्वासनही मोदींनी दिले.

दरम्यान, केंद्र सरकारने पहिली मोठी कारवाई केली आहे. उच्च शिक्षण विभागाचे सचिवपदावरून आयएएस अधिकारी विनीत जोशी यांना हटवून पंचायत राज मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या जागी नरेश पाल गंगवार यांच्याकडे उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT