PM Modi announces increase in PM Kisan scheme benefits during election rally. saam tv
देश विदेश

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

PM Kisan Scheme Upgrade : पश्चिम बंगाल निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी रविवारी एक मोठी घोषणा केली. बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यास पीएम किसान सन्मान निधी ९,००० रुपयांपर्यंत वाढवला जाईल.

Bharat Jadhav

  • पीएम किसान योजनेत वाढीची मोठी घोषणा

  • शेतकऱ्यांना ९,००० रुपये देण्याचे आश्वासन

  • पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी घोषणा

पश्चिम बंगालमधील विधान सभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणारा पीएम किसान सन्मान निधी ९,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल. सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरात वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये बँक खात्यात जमा केले जातात.

बोंगाव येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी महिलांसाठी अनेक आश्वासने दिली. यासह शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आले तर लखपती अभियानांतर्गत बंगालमधील ७५ लाख महिलांना मदत करेल. यामुळे त्या 'लखपती दीदी' बनू शकतील. त्या दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकतील."

बंगालच्या मुलींना त्यांच्या आवडीच्या नोकऱ्या करता येतील आणि २० लाख रुपयांपर्यंतचे मुद्रा कर्ज मिळू शकेल. कर्ज घेताना बँका हमी मागतात, पण बहिणींना ते कुठून मिळणार? म्हणूनच, तुमच्या भावाने ठरवले आहे की, तुमचा भाऊ मोदी बहिणींसाठी बँकेची हमी देईल, असं पंतप्रधान मोदी प्रचार सभेत म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "बंगाल भाजपने महिलांसाठी एक मोठी घोषणा केली. महिलांना दरवर्षी ३६,००० रुपये मिळतील. जर सरकार पाच वर्षे सत्तेत राहिले, तर त्यांना १,८०,००० रुपये मिळतील. त्याचप्रमाणे मुलींच्या शिक्षणासाठी ५०,००० रुपये दिले जातील. यासह पीएम आवास योजनेअंतर्गत घरे गरीब कुटुंबातील महिलांच्या नावावर आहेत. पक्के घर बांधण्यासाठी दीड लाख रुपये दिले जातील. बंगाल भाजप सरकार पीएम किसान सन्मान निधीदेखील नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arm Fat Loss Tips: नो जिम, नो डाएट! दंडावरची चरबी कमी करण्यासाठी वापरा 'या' ५ सोप्या ट्रिक

कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे हापूससाठी मोठी मागणी; स्कॅनिंग मशीनवर अनुदान द्या

Maharashtra News Live Update : खाजगी लक्झरी बस चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Shocking : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये शिक्षक विद्यार्थिनीसोबत नको त्या अवस्थेत, तरुणांनी व्हिडिओ काढला अन्...

Mumbai Tourism: लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं; येत्या विकेंडला मुंबईपासून फक्त 83 किमी असलेल्या या हिल स्टेशनला फिरून या

SCROLL FOR NEXT