तुम्हीही प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय? तर आत्ताच व्हा सावध! शरीरावर होऊ शकतात ५ गंभीर परिणाम

Manasvi Choudhary

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे फायदेशीर की घातक

प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर हा रोजच्या जीवनातला भाग बनला आहे. प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी आपण नेहमीच पित असतो. मात्र तुम्हाला माहितीये का? प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात.

Side Effects Of Plastic Bottles

मायक्रोप्लास्टिक शरीरात प्रवेश करते

आपण ज्या प्लास्टिकच्या बाटल्या वापरतो, त्यातून प्लास्टिकचे अत्यंत सूक्ष्म कण विरघळून पाण्यात मिसळतात. हे मायक्रोप्लास्टिक नकळत आपल्या पोटात जाऊ शकते.

Ingestion of Microplastics

हार्मोनल असंतुलन निर्माण होते

प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर केला जातो. ही रसायने आरोग्यावर वाईट परिणाम करतात यामुळे हार्मोनल असंतुलन होते.

Hormonal Imbalance

रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते

प्लास्टिकमधील विषारी रसायने सतत शरीरात जात राहिल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती हळूहळू कमजोर होऊ लागते.

Weakens Immunity

कर्करकेगाचा धोका वाढतो

प्लास्टिकच्या बाटल्या उन्हात किंवा गरम कारमध्ये ठेवल्यास त्यातील घातक रसायने वेगाने पाण्यात उतरतात यामुळे कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो.

Cancer

पचनक्रिया मंदावते

प्लास्टिकच्या पाण्यामुळे शरीरात विषारी घटक साचू लागतात, ज्यामुळे पचनसंस्था बिघडते, अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

Digestive Issues | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: डायबिटीजच्या रुग्णांनी जेवल्यानंतर १० मिनिटे का चालावे? कारण जाणून घ्या

Diabetes Care Tips
येथे क्लिक करा..