डायबिटीजच्या रुग्णांनी जेवल्यानंतर १० मिनिटे का चालावे? कारण जाणून घ्या

Manasvi Choudhary

डायबिटीज

सध्या बदलत्या जीवनशैलीनुसार डायबिटीज ही समस्या सामान्य बनली आहे. यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

diabetes | pinterest

जेवल्यानंतर १० मिनिटे का चालावे?

डायबिटीजच्या रूग्णांनी केवळ डाएट करून फायदा नाही तर तुम्ही जेवल्यानंतर फक्त १० मिनिटे चालणे देखील महत्वाचे आहे.

Diabetes Health Care Tips | freepik

आरोग्यासाठी घातक

आपल्यापैकी अनेकांना जेवल्यानंतर लगेचच झोपण्याची आणि बसून राहण्याची सवय आहे. मात्र ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Diabetes Health Care Tips | pinterest

जेवणानंतर का चालावे?

तुम्हाला माहित आहे का जेवणानंतर लगेचच झोपणे किंवा बसून राहणे आरोग्यासाठी चांगले नाही.

Diabetes Health Care Tips | Yandex

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते

आपण जेव्हा जेवतो, तेव्हा अन्नातील कार्बोहायड्रेट्सचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. मात्र जेवल्यानंतर लगेच १० मिनिटे चालल्याने रक्तातील साखर अचानक वाढण्याची शक्यता कमी होते.

blood sugar control | GOOGLE

इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते

जेवल्यानंतर १० मिनिटे चालल्याने शरीरातील इन्सुलिन कार्यक्षमता सुधारते, ज्यामुळे नैसर्गिकरीत्या साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

Improves Insulin Sensitivity | saam tv

पचनक्रिया सुधारते

जेवल्यानंतर अनेकदा पोट जड होणे, अपचन किंवा गॅसची समस्या जाणवते. मात्र तुम्ही जर जेवल्यानंतर चालण्याचा व्यायाम केला तर तुम्हाला हा त्रास होणार नाही.

Aids Digestion | Saam Tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: रक्षाबंधन सण येतोय! लाडक्या भावासाठी बनवा सुंदर १ ग्रॅम चांदीच्या राख्या

येथे क्लिक करा..