Manasvi Choudhary
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भावाला ओवाळते.
यंदाच्या रक्षाबंधनला बाजारातून महागड्या राख्या आणण्याऐवजी काहीतरी हटके आणि युनिक करायचे असेल, तर तुम्ही १ ग्रॅम चांदीची राखी निवडू शकता.
चांदी आरोग्यासाठी गुणकारी मानली जाते. चांदीची राखी तुम्ही भावाच्या मनगटावर बांधली तर आनंदी आणि निरोगीमय सण साजरा होईल. याचनिमित्त चांदीच्या राख्यांचे युनिक डिझाईन्स आपण या वेबस्टोरीतून पाहूया.
राखीमध्ये मध्यभागी चांदीचा छोटा 'गणपती बाप्पा', 'ॐ', 'त्रिशूळ' किंवा 'स्वास्तिक'चे चिन्ह असलेला राख्या तुम्ही निवडू शकता.
भावासाठी तुम्ही खास त्यांच्याच नावाच्या कस्टमाईज्ड राखी बनवून घेऊ शकता. या डिझाईनमध्ये चांदीच्या एका पातळ प्लेटवर इंग्रजीत किंवा मराठीत भावाचे नाव कोरलेले असते.
राखीमध्ये लहान आकाराचे ओरिजनल रुद्राक्ष आणि त्यांच्यामध्ये चांदीचे लहान मणी किंवा चांदीचे पदक अशी डिझाईन तुम्ही निवडू शकता.
युनिक डिझाईनमध्ये इव्हिल आय डिझाईन मध्ये तुम्ही राखी निवडू शकता. अत्यंत रॉयल दिसते.
आजकालच्या तरुणांमध्ये ब्रेसलेट टाईप राख्यांची प्रचंड क्रेझ आहे. यासाठी तुम्ही ब्रेसलेट स्टाईल राखी तुम्ही निवडू शकता. जी सिल्व्हर चेनसारखी असते.