PM Modi Parliament Speech sansad tv
देश विदेश

PM Modi: यूपीएने प्रत्येक संधीचं रूपांतर संकटात केलं, 2004 ते 14 हा काळ 'लॉस्ट डेकेड'; पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर

Chandrakant Jagtap

PM Modi Parliament Speech: लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. यावेळी आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार पलटवार केला. देशाच्या इतिहासात 2004 ते 14 हा काळ 'लॉस्ट डेकेड' म्हणून ओळखला जाईल अशी टिका मोदींनी यावेळी केली. तसेच या काळात यूपीएने प्रत्येक संधीचं रूपांतर संकटात केलं, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर पलटवार केला.

मोदी म्हणाले, जेव्हा जग तंत्रज्ञानात पुढं जात होतं तेव्हा हे 2जी मध्ये फसलेले होते. सिव्हिल न्युक्लिअर डील सुरु असताना हे व्होट फॉर कॅशमध्ये फसले होते. कॉमनवेल्थ गेम्समध्येही घोटाळा झाला. हेलिकॉप्टर घोटाळे झाले. यूपीएच्या दहा वर्ष दहशतवादी हल्ले झाले, तेव्हा सरकारला आतंकवाद्यांना उत्तर देता आले नाही. देशाच्या इतिहासात 2004 ते 2014 हा काळ 'द लॉस्ट डेकेड' म्हणून ओळखला जाईल. (Latast News Update)

विरोधकांनी 9 फक्त आरोप केले - मोदी

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारत ही लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत टिकेला महत्त्व आहे. परंतु 9 वर्ष कोणीही विश्लेषण केले नाही. फक्त आरोप करण्याशिवाय दुसरे काही केले नाही. निवडणूक हारले की इव्हीएमवर आरोप, निर्णय विरोधात गेला तर सर्वोच्च न्यायालयाला शिव्या, भ्रष्टाचाराची चौकशी करत असेल तर तपास यंत्रणांना शिव्या, आर्मी पराक्रम करत असेल तर आर्मीवर आरोप, आर्थिक प्रगती केली तर, आरबीआयला शिव्या देतात."

इडीने यांना एका मंचावर आणलं - मोदी

राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी विरोधकांवर जोरदार शब्दात पलटवार केला. ते म्हणाले, "इडीने यांना एका मंचावर आणले. जे काम देशातले मतदार करु शकले नाही ते इडीने केले". राहुल गांधींवर पलटवार करताना मोदी म्हणाले की, "एक नेते सतत हार्वर्डचं नाव घेत असतात. त्यांच्यात हार्वर्ड स्टडीची खूप क्रेझ आहे. काही दिवसांपूर्वी हार्वर्डमध्ये एका महत्वाच्या विषयावर अभ्यास झाला आहे. काँग्रेस पक्षाचा उदय आणि पतन हा या अभ्यासाचा विषय आहे"

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

Women's T20 WC: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! लाजिरवाण्या पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं संकट ; पाहा Points Table

Chandrapur School Bus Accident : विद्यार्थांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, बसमध्ये होते ६० विद्यार्थी

SCROLL FOR NEXT