Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. विकासाच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. निराशेत बुडालेले लोक देशातील प्रगतीचा स्वीकार करत नाही, असं म्हणतं नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली आहे. (Latest Marathi News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या आभाराबरोबर त्यांचं अभिनंदन केले. राष्ट्रपतींनी आदिवासी समाजाचा गौरव तर वाढवला, त्याचबरोबर त्यांच्यामुळं आदिवासी समाजाचा विश्वास वाढला आहे. त्यामुळं हे सदन त्यांचं आभारी आहे .
'राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या भाषणात संकल्पातून सिद्धी कडे नेण्याचा ढाचा दिला गेला आहे.लोकसभेत अनेक खासदारांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं. ते जाणीवपुर्वक ऐकलं तर लक्षात येतं की, कोणाची किती क्षमता आहे. कोणाची किती योग्यता आहे. कोणाची किती समज आहे. आणि कोणाचा काय हेतू आहे? या सगळ्या बाबी समोर येतच असतात. देश त्याचं मुल्याकनही करत असतो', असं नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.
'ये कह कह के हम दिल को बहला रहे हैं, वो अब चल चुके हैं, वो अब आ रहे है, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना टोला लगावला. एक मोठ्या नेत्याने राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा अपमान देखील केला आहे. जनजातीय प्रती, समाजाप्रती त्यांचा विचार काय आहे? मात्र, मनात असलेला भाव टीव्ही समोर तर आला ठीक आहे... नंतर पत्र लिहिण्यात आलं. राष्ट्रपतीच्या भाषणावर कोणाचाही आक्षेप नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर टीका करताना म्हणाले, 'निराशेत बुडालेले लोक देशातील प्रगतीचा स्वीकार करत नाही. त्यांना भारतीयांना मिळालेल्या संधी दिसत नाही आहे. गेल्या ९ वर्षात देशात ९० हजार स्टार्टअप्स सुरू झाले. देशात कमी काळात कोरोना सारख्या बिकट परिस्थितीत १०८ युनिकॉर्न स्टार्टअप्स उभे राहिले'.
'एक यूनिकॉर्नमध्ये ६ ते ७ हजार हजार कोटी रुपयांचं मुल्य असतं. आज जगात मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशांतर्गत विमान प्रवासात तिसऱ्या क्रमांकावर आहे. रिन्यूएबल एनर्जीमध्ये आपण जगात चौथ्या क्रमांकावर आहोत', असे नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.