PM Modi reaction on operation sindoor Air Strike in Pakistan ANI
देश विदेश

Operation Sindoor : अभिमानास्पद क्षण! पहलगामचा बदला घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

PM Modi First Reaction after Air Strike : भारतानं पाकिस्तानमध्ये मध्यरात्री हवाई हल्ले करून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. भारतानं राबवलेल्या ऑपरेशन मिशननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, असे मोदी म्हणाले.

Nandkumar Joshi

भारताच्या तिन्ही दलांनी मध्यरात्री पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये सर्व अड्डे उद्ध्वस्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना मोदींनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा देशासाठी अभिमानास्पद क्षण आहे, असं ते म्हणाले.

कोणतीही चूक न करता एअर स्ट्राइक यशस्वी

भारतीय लष्कराने जशी तयारी केली होती, त्याच पद्धतीने कोणतीही चूक न करता कारवाई केली आहे. हा आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद क्षण आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी लष्कराचं कौतुक केलं. त्यानंतर मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करतानाच, संपूर्ण देश तुमच्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत माहिती दिल्याचे सांगितले जाते. मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं. ही कारवाई करायचीच होती, असं पंतप्रधान मोदी यावेळी बैठकीत म्हणाल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. संपूर्ण देशाचं आमच्याकडं लक्ष होतं. भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गारही मोदींनी यावेळी काढले.

१०० दहशतवादी मारले गेल्याचा दावा

भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात मुरीदकेस्थित लश्कर ए तोयबाचं मुख्यालय, बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे लाँचिंग पॅड आणि इतर महत्वाची ठिकाणे होती. या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे.

अवघ्या २५ मिनिटांत कारवाई

भारताने पाकिस्तानमध्ये मध्यरात्री घुसून कारवाई केली. या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी संरक्षण खाते, परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, भारताच्या सुरक्षा दलांनी ६ आणि ७ मे रोजीच्या मध्यरात्री १ वाजून ०५ मिनिटांनी कारवाई सुरू केली. दीड वाजेपर्यंत हे हल्ले सुरू होते. जवळपास २५ मिनिटे ही कारवाई करण्यात आली. यात नऊ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली.

पहलगाम हल्ल्याचा बदला

पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. २२ एप्रिलला हा हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या १४ दिवसांनंतर भारतानं बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT