PM Modi meets Ukraine President Zelensky
PM Modi meets Ukraine President Zelensky Saam Tv
देश विदेश

PM Modi meets Ukraine President Zelensky: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि पंतप्रधान मोदींची समोरासमोर पहिलीच भेट, 'या' मुद्द्यावर झाली चर्चा

Satish Kengar

PM Modi meets Ukraine President Zelensky: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची शनिवारी जपानमधील हिरोशिमा येथे भेट झाली. यादरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चाही झाली. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना ही बैठक झाली आहे. याआधीही पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात अनेकदा फोनवर चर्चा झाली आहे. युद्धादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये ही पहिलीच समोरासमोर भेट झाली आहे.

दोन्ही नेत्यांच्या भेटीत युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (ajit doval) ही उपस्थित होते. G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी 19 मे रोजी हिरोशिमा, जपानला पोहोचले आहेत. (Latest Marathi News)

तत्पूर्वी त्यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी जपान आणि भारताच्या G-7 आणि G20 च्या अध्यक्षतेखालील अनेक जागतिक आव्हानांवर चर्चा केली. शनिवारी त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांचीही भेट घेतली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात रशियाने विशेष लष्करी कारवाईचे नाव देत युक्रेनवर हल्ला केला होता. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातील ही पहिली भेट आहे.

रशियासोबत युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींना अनेकदा फोन करून युद्ध थांबवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे, असे बोलले जाते. पंतप्रधान मोदींनी युद्ध सुरू झाल्यापासून अनेक वेळा दोन्ही देशांच्या प्रमुखांना शांततेचे आवाहन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

Sambhajinagar News : संभाजीनगरात ड्रग्स, गुटख्यासह ७७ लाखांची दारू जप्त; आचारसंहितेची सुरुवात झाल्यापासूनची कारवाई

Kolhapur Election: हळहळ! मतदान केंद्राबाहेरच वृद्धाला हृदयविकाराचा झटका, रांगेतच सोडला जीव

Gujrat News: अजब गजब... गणितात २०० पैकी २१२ अन् भाषेत २११ गुण; मुलीचं मार्कशीट व्हायरल

PM Narendra Modi: ...तर तुम्ही तुमच्या मुलाचं भविष्य खराब करताय!; PM मोदींनी मुस्लिम बांधवांना केलं सावध

SCROLL FOR NEXT