PM Narendra Modi Saam Tv
देश विदेश

Ukraine Crisis: PM मोदींनी घेतली राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकार 'ऑपरेशन गंगा' राबवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २४ तासांत दोनदा उच्चस्तरीय बैठका घेऊन रणनीती आखली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांची भेट घेतली आणि त्यांना युक्रेन संकटासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी आता केंद्रीय मंत्र्यांना कंबर कसली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि व्हीके सिंग हे युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाऊन या मोहिमेचे समन्वय साधून विद्यार्थ्यांना मदत करतील, असा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला. हे मंत्री भारताचे 'विशेष दूत' म्हणून तेथे जाणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सिंधिया रोमानिया आणि मोल्दोव्हा यांच्याशी समन्वय साधतील, तर रिजिजू स्लोव्हाकियाला जाणार आहेत. पुरी हंगेरीला जाणार असून जनरल व्हीके सिंग पोलंडला जाऊन भारतीयांना बाहेर काढण्याची व्यवस्था करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अहेरी विधानसभेत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Sara Ali Khan Networth: 'पतौडी' घराण्यात जन्मली सारा; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT