PM Narendra Modi Saam Tv
देश विदेश

'बा'ची शतकपूर्ती; पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला

यापूर्वी 11 मार्च रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना अहमदाबादमध्ये त्यांनी आईची भेट घेतली होती.

वृत्तसंस्था

गुजरात - पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 आणि 18 जून हे दोन गुजरात (Gujarat) दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुजरातला एक मोठी भेट देणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी २१,००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांचा 100 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या आईची सदिच्छा भेट घेतली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये त्यांच्या भावाच्या घरी पोहोचले. यापूर्वी 11 मार्च रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना अहमदाबादमध्ये त्यांनी आईची भेट घेतली होती.

पंतप्रधान मोदी आईच्या वाढदिवसानिमित्त हटकेश्वर मंदिरात पुजा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्तच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यक्रमस्थळी विशेष व्यवस्था करण्यात आली असून पोलिसांचा मोठा फौज फाटा तैणात करण्यात आला आहे.

16 हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी

पीएम मोदी आज गुजरात गौरव अभियानादरम्यान 16,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यावेळी फ्रेट कॉरिडॉरचा 357 किमी लांबीचा न्यू पालनपूर-मदार विभागाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

याशिवाय, 81 किमी लांबीच्या पालनपूर-मिठा विभागाचे विद्युतीकरण, सोमनाथ, सुरत, उधना आणि साबरमती स्थानकांच्या पुनर्विकासाची आणि 166 किमी अहमदाबाद-बोताड विभागाच्या गेज हस्तांतरणाची पायाभरणी देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे दिली जातील

गुजरातमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पंतप्रधान मोदी गरिबांना एकूण 1.38 लाख घरे समर्पित करणार आहेत. ज्यामध्ये शहरी भागात सुमारे 1,800 कोटी रुपयांची घरे आणि ग्रामीण भागात 1,530 कोटी रुपयांहून अधिक घरांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री मातृशक्ती योजनेवर 800 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत

गुजरातमध्ये आई आणि तिच्या बाळाच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 'मुख्यमंत्री मातृशक्ती योजना' सुरू करण्यात येणार आहे. ज्यावर सरकार 800 कोटी रुपये खर्च करणार आहे. यासोबतच गरोदर व स्तनदा महिलांना या योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांमधून दर महिन्याला 2 किलो हरभरा, 1 किलो तूर डाळ आणि 1 किलो खाद्यतेल मोफत दिले जाणार आहे.

गुजरात केंद्रीय विद्यापीठाची पायाभरणी

दरवर्षी 2500 हून अधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने वडोदरा शहरापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या गुजरात केंद्रीय विद्यापीठाची पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार आहेत. या बांधकामासाठी सुमारे 425 कोटी रुपये खर्च येणार आहे.

21 हजार कोटींच्या योजनाचं उद्घाटन आणि पायाभरणी

यावेळी पंतप्रधान मोदी 21 हजार कोटी रुपयांच्या योजनेचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान मोदी आज सकाळी 9.15 वाजता पावागड टेकडीवरील श्री कालिका मातेच्या पुनर्विकसित मंदिराचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर रात्री 11.30 वाजता मोदी हेरिटेज फॉरेस्टलाही भेट देतील.

गुजरात अभिमान मोहिमेत घेणार भाग

पंतप्रधान आज दुपारी 12:30 वाजता वडोदरा येथे गुजरात गौरव अभियानात सहभागी होणार आहेत. यावेळी पंतप्रधान 21,000 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करुन गुजरातला एक मोठी भेट देणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT