Pragya Singh Thakur Saam Tv
देश विदेश

Sadhvi Pragya: 'मोदीजींना माझे शब्द आवडले नसावेत', तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर काय म्हणाल्या?

Satish Kengar

Pragya Singh Thakur News:

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांचाही या यादीत समावेश आहे. यावेळी त्यांच्या जागी आलोक शर्माला संधी देण्यात आली आहे.

'आज तक'च्या वृत्तानुसार, भाजपने त्यांना तिकीट नाकारलं. याबाबत त्यांना विचारलं असता प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, मी कदाचित काही शब्द बोलले असतील जे मोदींना आवडले नसतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्या म्हणाल्या, कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही, हा संघटनेचा निर्णय आहे. यामध्ये तिकीट का कपालं गेलं. ते कोणाला का दिलं गेलं, याचा अजिबात विचार करू नये. त्या म्हणाल्या, मी यापूर्वी तिकीट मागितले नव्हते आणि आताही नाही. (Latest Marathi News)

दरम्यान, भाजपने कालच १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ३४ विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. प्रज्ञा ठाकूर यांचे तिकीट कापले जाईल, याची चर्चा आधीच राजकीय वर्तुळात सुरु होती. प्रज्ञा ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानांवर पक्ष नेतृत्व नाराज असल्याचे मानले जात होते. अशातच त्यांच्या तिकिटावर कात्री लागण्याची सर्वाधिक शक्यता होती.

गोडसेला देशभक्त म्हटल्याने पंतप्रधान मोदी होते नाराज

अनेकदा वादग्रस्त विधाने करून टीकेच्या भोवऱ्यात सापडलेल्या प्रज्ञा ठाकूर यांनी असे वक्तव्य केले होते, ज्यावर पंतप्रधान मोदींनीही नाराजी व्यक्त केली होती आणि त्यांना (प्रज्ञा ठाकूर यांना) कधीही माफ करू शकणार नाही, असे म्हटले होते. प्रज्ञा ठाकूर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला खरा देशभक्त म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांसह पक्षांतर्गतही जोरदार टीका झाली होती. प्रज्ञा ठाकूर यांनी माफी मागितली असली तरी आपण त्यांना कधीही माफ करू शकणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT