PM Modi Independence Day greetings Saam Tv
देश विदेश

Independence Day 2024 : राष्ट्रपतींसह, PM मोदींनी जनतेला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; म्हणाले, माझ्या भारतीय बांधवांना ...

PM Modi Independence Day greetings : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी आज ध्वजारोहन करणार आहेत. राष्ट्रपतींनी देखील स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : संपूर्ण देश आज ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी X अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद! माझ्या भारतीय बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक (PM Modi Independence Day) शुभेच्छा. जय हिंद!

राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झालाय. मी पुन्हा एकदा तुम्हाला, विशेषत: सशस्त्र दलातील आपल्या शूर जवानांना, जे आपला जीव धोक्यात घालून आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करतात, त्यांना शुभेच्छा देते, अशी सोशल मीडिया पोस्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलीय. त्यांनी देशातील नागरिकांना जवानांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वातंत्र्यदिनाची थीम काय?

भारतीय आज ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर सकाळी साडेसात वाजता राष्ट्रध्वज फडकावणार आहेत. पंतप्रधान मोदी आज संपू्र्ण देशाला संबोधित करणार (India independence day 2024) आहेत. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम 'Developed India @2047' आहे. २०४७ मध्ये स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारताला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या दिशेने सरकारच्या प्रयत्नांना पुढे नेणे, हा यामगचा उद्देश आहे.

ज्यावेळी पंतप्रधान मोदी ध्वजारोहण करण्यासाठी तटबंदीच्या दिशेने जातील, तेव्हा स्वदेशी १०५ मिमी लाइट फील्ड गनमधून २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. या सोहळ्यासाठी सुमारे सहा हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलंय. विशेषत: अटल इनोव्हेशन मिशन सारख्या उपक्रमांशी संबंधित लोक, मेरा युवा भारतचे स्वयंसेवक, आदिवासी समुदायातील लोक आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमात उपस्थित असणार आहेत.

हेलिकॉप्टरमधून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव

पंतप्रधानांनी ध्वजारोहण केल्यावर स्वदेशी प्रगत हलक्या हेलिकॉप्टरमधून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जाणार आहे. हे हवाई प्रदर्शन भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर्सद्वारे केले जाईल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहणासोबतच नॅशनल कॅडेट कॉर्प्सचे कॅडेट्स राष्ट्रगीत गाणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Maharashtra News Live Updates: महायुतीची आज कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

SCROLL FOR NEXT