PM Modi Angry Reaction On Women Atrocities Saam Tv
देश विदेश

Subhadra Yojana: पंतप्रधान मोदींनी वाढदिवशी २५ लाख महिलांना दिलं रिटर्न गिफ्ट; सुभद्रा योजनेचा केला शुभारंभ

Subhadra Yojana: पंतप्रधान मोदींनी आपल्या वाढदिवशीं महिलांना रिटर्न गिफ्ट दिलंय. ओडिशामध्ये सुभ्रदा योजना सुरू केलीय.

Bharat Jadhav

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ७४ व्या वाढदिवशी देशातील २४ लाख महिलांना रिटर्न गिफ्ट दिलंय. पंतप्रधान मोदींनी ओडिशामध्ये सुभ्रद्रा योजना सुरू केली आहे. योजनेच्या अंतर्गत २५ लाख महिलांना ५००० रुपयांचा पहिला हप्ता दिलाय.

सुभ्रद्रा योजना योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी ओडिशा सरकारने सुरू केलीय. भुवनेश्वरमध्ये एका भव्या या योजनेच्या अंतर्गत १ कोटी पेक्षा जास्त महिलांना पुढील वर्षांसाठी प्रत्येक वर्षाला १०,००० हजार रुपये दिले जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री मोहन माझी, राज्यपाल रघुबर दास, केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान आणि ओडिशा सरकारचे इतर मंत्री यावेळी उपस्थित होते. मंगळवारी २५ लाखांहून अधिक महिलांना सुभद्रा योजनेअंतर्गत ५००० रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे.

'ओडिशासाठी मोदींची हमी' अंतर्गत सुभद्रा योजना हे भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख वचन होतं. मोदींची हमी या प्रचाराने भाजपने या वर्षी जूनमध्ये राज्यात प्रथमच स्वबळावर सरकार स्थापन केलं. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपनं ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती. सरकारच्या मते, २१ ते ६० वर्षे वयोगटातील एक कोटी महिलांना पाच वर्षांत ५०,००० रुपयांची रोख मदत द्यायची आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने ५५००० कोटी रुपयांच्या खर्च केलाय.

रेल्वे प्रकल्पांनाही हिरवा कंदील

भुवनेश्वर येथे पीएम मोदींनी प्रधानमंत्री आवास योजना-अर्बनच्या लाभार्थीची त्यांच्या घरी भेट घेतली. याआधी पंतप्रधान मोदी यांनी व्हच्युअलपणे १००० कोटी रुपयांच्या नॅशनल महामार्गाच्या प्रकल्पांचा शिलान्यास केला. तसेच पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या अंतर्गत १४ राज्यांना साधरण १३ लाख लाभार्थ्यांना आर्धिक मदतीचा पहिला हप्ता दिला. २६ लाख PMAY लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या चाव्या देण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT