देश विदेश

ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल PM मोदींनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले, सोबत मिळून...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rishi Sunak: भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Rishi Sunak) त्यांचे अभिनंदन केले. जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यास आणि रोडमॅप 2030 ची अंमलबजावणी करण्यास आपण उत्सुक असल्याचं देखील पंतप्रधान ट्विटमध्ये म्हटले आहेत.

ऋषी सुनक यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, 'ऋषी सुनक यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तुम्ही ब्रिटनचे पंतप्रधान बनणार आहात, मी जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यास आणि रोडमॅप 2030 ची अंमलबजावणी करण्यास उत्सुक आहे. ब्रिटिश भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा. आपण ऐतिहासिक संबंधांचे आधुनिक भागीदारीत रूपांतर केले आहे.'

पाहा व्हिडीओ -

तर ब्रिटनच्या (Britain) पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल ऋषी सुनक यांना त्यांना पाठिंबा देणाऱ्या सहकारी खासदारांनी पाठिंबा दिल्याबाबत त्यांनी खासदारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. शिवाय मी पंतप्रधानपदाची जबाबदारी नम्रतेने स्वीकारतो, असंही सुनक म्हणाले आहेत.

दरम्यान, भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनून त्यांनी नवा इतिहास रचला आहे. दिवाळीच्या दिवशी 42 वर्षीय ऋषी सुनक कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 357 खासदारांपैकी अर्ध्याहून अधिक खासदारांचा पाठिंबा होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : परभणीत हिंस्र प्राण्यांचा शेळ्यांवर हल्ला, शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान

चटईवर झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Patra Chawl Scam: संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ', स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

Jalna News | जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक! भाजप कार्यकर्ते आंदोलकांमध्ये झटापट...

SCROLL FOR NEXT