Iran-Israel War Saam Tv
देश विदेश

Iran-Israel War: युद्धादरम्यान PM मोदींचा थेट नेतान्याहूंना फोन, नेमकी काय चर्चा झाली? भारतात मोठी बैठक

PM Modi Calls Netanyahu: इराण-इस्राइलमध्ये युद्धाचा भडका उडाला. दोन्ही देशामध्ये परिस्थिती गंभीर आहे. यादरम्यान पीएम मोदींनी यूएईचे अध्यक्ष आणि इस्राइलचे पंतप्रधान या दोघांशी फोनवरून चर्चा केली.

Priya More

Summary -

  • इराण-इस्राइल युद्धादरम्यान पीएम मोदींचा नेतान्याहूंना फोन

  • संघर्ष थांबवण्याचे आणि शांततेचे पीएम मोदींकडून आवाहन

  • यूएई अध्यक्षांशीही मोदींनी फोनवरून केली चर्चा

  • भारतात CCS ची उच्चस्तरीय बैठक

इराण -इस्राइल या देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले करत आहे. यामुळे दोन्ही देशात तणावाचे आणि चिंतेचे वातावरण आहे. इराण युद्धादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. नेतान्याहू यांना फोन करण्यापूर्वी पीएम मोदींनी युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशीही फोनवरून चर्चा केली. अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी संयुक्तपणे इराणविरोधात लष्करी कारवाई सुरू केली. इराणवर जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा मृत्यू झाला.

पीएम मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत बेंजामिन नेतान्याहू आणि शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासोबत चर्चा झाल्याचे सांगितले. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून संपर्क केला आणि सध्याच्या प्रादेशिक परिस्थितीवर चर्चा केली. या संभाषणादरम्यान मी अलिकडच्या घडामोडींबद्द चिंता व्यक्त केल्या आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यावर भर दिला. भारताने शक्य तितक्या लवकर शत्रुत्व थांबवण्याची गरज पुन्हा व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी रविवारी रात्री यूएईचे अध्यक्षशेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि आखाती देशावरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. या हल्ल्यांमध्ये जीव गमावलेल्यांबाबत मोदींनी संवेदना व्यक्त केल्या. पीएम मोदींनी सांगितले की, 'या कठीण काळात भारत यूएईसोबत पूर्ण एकजुटीने उभा आहे. आखाती देशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल मोदींनी यूएईच्या अध्यक्षांचे आभार मानले. देशातील तणाव कमी करण्यासाठी आणि प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेसाठी भारताचा पाठिंबा असल्याचे सांगितले.' इराणने केलेल्या हल्ल्यामध्ये यूएईमधील ३ जणांचा मृत्यू झाला तर ५८ जण जखमी झाले.

रविवारी रात्री पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक पार पडली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर जागतिक परिस्थिती आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. सीसीएस ही देशाच्या सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींवर निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नागपुरातील एसबीएल कंपनीतील स्फोट प्रकरणी नऊ जणांना अटक

Success Story : १७ हजारात व्यवसाय उभारला, सहा महिन्यात १५ लाखांचा नफा; जयपूरमधील दोन बेस्टफ्रेंडची सोशल मीडियावर चर्चा

Ajit Pawar : उत्तरे मिळायला हवीत! अजित पवार विमान अपघात अहवालावर जय पवार नाराज, स्पष्ट शब्दात म्हणाले...

Raigad Tourism : अलिबागजवळील 'हा' सागरी किल्ला एकदा पाहाच, अरबी समुद्राच्या मनमोहक सौंदर्याच्या प्रेमात पडाल

Bigg Boss Marathi 6 : एक नव्हे 'बिग बॉस'मध्ये थेट ३ वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री, घराचे तापमान वाढणार

SCROLL FOR NEXT