GST: गुड न्यूज! जीएसटीमध्ये आणखी कपात होणार, पीएम मोदींनी दिले संकेत

PM Narendra Modi On GST: जीएसटीमध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यात आणखी टॅक्स कपात करण्याचे संकेत दिले
GST: गुड न्यूज! जीएसटीमध्ये आणखी कपात होणार, पीएम मोदींनी दिले संकेत
PM Narendra ModiSaam Tv
Published On

Summary -

  • पीएम मोदींनी जीएसटी कपातीबाबत आनंदाची बातमी दिली.

  • भविष्यात आणखी टॅक्स कमी करण्याचे संकेत पीएम मोदींनी दिले.

  • कपड्यांपासून वाहनांपर्यंत सर्व वस्तूंवरील टॅक्स कमी होणार आहे.

  • शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जीएसटीमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा मोदी सरकारने केली होती. या घोषणेनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. भविष्यात त्यांनी आणखी टॅक्स कपात करण्याचे संकेत दिले. अर्थव्यवस्था मजबूत होत असताना टॅक्स कमी होत राहतील, असे विधान पीएम मोदी यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, '२०१४ मध्ये १ लाख रुपयांच्या खरेदीसाठी अंदाजे २५,००० रुपयांचा टॅक्स द्याव लागत होता. आता त्यामध्ये घट झाली असून हा टॅक्स ५ ते ६ हजारांवर आला आहे.'

उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाचे पीएम मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये कपात आणि त्यामुळे होणाऱ्या बचतीबद्दल सविस्तर भाष्य केले. भविष्यात होणाऱ्या टॅक्स कपातीचे संकेत त्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले की, 'आज देश जीएसटी बचत उत्सव साजरा करत आहे. आपण इथेच थांबणार नाही. २०१७ मध्ये आम्ही जीएसटी लागू केला आणि आर्थिक बळकटीसाठी काम केले. २०२५ मध्ये आम्ही तो पुन्हा लागू करू आणि अर्थव्यवस्था आणखी मजबूत करू. अर्थव्यवस्था मजबूत होत असताना टॅक्सचा भार कमी होईल. देशातील जनतेच्या आशीर्वादाने जीएसटी सुधारणांची प्रक्रिया अशीच सुरू राहील.'

GST: गुड न्यूज! जीएसटीमध्ये आणखी कपात होणार, पीएम मोदींनी दिले संकेत
GST Reform: आजपासून नवे दर! काय स्वस्त? काय महाग? वाचा संपूर्ण लिस्ट

पंतप्रधान मोदी यांनी पुढे असेही सांगितले की, '२०१४ पूर्वी खूप जास्त टॅक्स होते. एक प्रकारे टॅक्सचे जाळे होते. त्यामुळे व्यवसायाचा खर्च आणि कुटुंबाचे बजेट दोन्हींचे संतुलन कधीच होऊ शकले नाही. तेव्हा १००० रुपयांच्या शर्टवर ११७ रुपये टॅक्स आकारला जात होता. २०१७ मध्ये जेव्हा आम्ही जीएसटी लागू केला तेव्हा जीएसटी १७० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आला. आता २२ सप्टेंबरनंतर त्याच शर्टवर फक्त ३५ रुपये जीएसटी भरावा लागत आहे.'

GST: गुड न्यूज! जीएसटीमध्ये आणखी कपात होणार, पीएम मोदींनी दिले संकेत
Mega Sale 2025: डबल धमाका! एकीकडे GST कपात आणि दुसरीकडे अमेझॉन-फ्लिपकार्ट विक्री, सवलतींचा दुप्पट फायदा

तसंच, '२०१४ मध्ये जर कोणी टूथपेस्ट, तेल, शॅम्पू इत्यादींवर १०० रुपये खर्च केले तर ३१ रुपये टॅक्स आकारला जात होता. २०१७ मध्ये हा टॅक्स १८ रुपयांवर आणण्यात आला. आता १३१ रुपयांची वस्तू १०५ रुपयांवर आली आहे. २०१४ पूर्वी जर एखाद्या कुटुंबाने वर्षाला एक लाख रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या तर त्यांना सुमारे २५,००० रुपये टॅक्स भरावा लागत होता. नेक्स्ट जनरेशन जीएसटी लागू झाल्यानंतर त्यांना आता फक्त ५ ते ६ हजार रुपये कर भरावा लागतोय. कारण बहुतेक आवश्यक वस्तूंवर आता फक्त पाच टक्के जीएसटी आकारला जात आहे.', असे मोदी म्हणाले.

GST: गुड न्यूज! जीएसटीमध्ये आणखी कपात होणार, पीएम मोदींनी दिले संकेत
GST Reforms: जीएसटी कपाती, 'ही' कार बनली जगातील सर्वात बजेट फ्रेंडली कार, GST नंतर मोठी बचत

यासोबतच पीएम मोदी यांनी वाहन खरेदीबाबत देखील भाष्य केले. ते म्हणाले की, '२०१४ पूर्वी ट्रॅक्टर खरेदीवर ७०,००० रुपयांपेक्षा जास्त टॅक्स भरावा लागत होता. आता त्याच ट्रॅक्टरवर फक्त ३०,००० रुपये टॅक्स भरावा लागतो. शेतकरी ट्रॅक्टरवर ४०,००० रुपये वाचवत आहेत. पूर्वी तीनचाकी वाहनांवर ५५,००० रुपये टॅक्स असायचा पण आता त्यावर जीएसटी सुमारे ३५,००० रुपयांवर आणला गेला आहे. यामुळे २०,००० रुपयांची बचत होत आहे. जीएसटी कमी झाल्यामुळे २०१४ च्या तुलनेत स्कूटर ८,००० रुपयांनी आणि मोटारसायकली ९,००० रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीयांसह सर्वांच्या पैशांची बचत होत आहे.'

GST: गुड न्यूज! जीएसटीमध्ये आणखी कपात होणार, पीएम मोदींनी दिले संकेत
Income Tax Refund: ITR फाइल केला पण रिफंड आलाच नाही? आयकर विभागाने कारणे सांगितली, वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com