PM Modi Popular On Social Media  
देश विदेश

PM मोदी बनले सर्वाधिक लोकप्रिय नेते, सोशल मीडियावर झालेत १००मिलियन फॉलोअर्स

PM Modi Popular On Social Media : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनलेत. पीएम मोदींचे X वर १०० मिलियन फॉलोअर्स झालेत.

Bharat Jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सर्वाधिक फॉलो केलेले जाणारे जागतिक नेते बनलेत. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणारे १०० मिलियन फॉलोअर्स आहेत. या लोकप्रियतेपुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सुद्धा कमी पडलते. बायडन यांचे ३८.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर दुबईचे शासन कर्ते शेख मोहम्मद यांचे ११.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर पोप फ्रान्सिस याचे सोशल मीडियावरील १८.५ मिलियन फॉलोअर्स झालेत.

भारतात इतर भारतीय राजकारण्यांपेक्षा पंतप्रधान मोदींचे फॉलोअर्स जास्त आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे २६.४ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे २७.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. दरम्यान पीएम मोदींचे फॉलोअर्स वाढल्याची माहिती खुद्द पंतप्रधान मोदींनीच दिलीय. मोदी पोस्ट करत म्हणाले, एक्स वर शंभर मिलियन! या प्लॅटफॉर्मवर येऊन मी आनंदी आहे.

चर्चा, वाद विवाद, अंतर्दृष्टी, लोकांचे आशीर्वाद, रचनात्मक टीका अशा बऱ्याच गोष्टी मला आवडतात. भविष्यात देखील अशाच रोमांचक काळ रहील अशी अपेक्षा, मोदींनी व्यक्त केलीय. PM मोदी हे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (१९.९ मिलियन), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (७.४ मिलियन), राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे २.९ मिलियन फॉलोअर्स आहेत.

X वर PM मोदींच्या लोकप्रियतेमुळे, जागतिक नेते त्यांच्याशी कनेक्ट होण्यास उत्सुक आहेत, कारण त्यांच्याशी जोडले गेल्याने त्यांचे स्वतःचे फॉलोअर्स, इंगेजमेंट , व्ह्यूज आणि पुन्हा पोस्ट वाढत असतात. X वर विराट कोहलीपेक्षा पंतप्रधान मोदी अधिक लोकप्रिय आहेत.केवळ राजकारणीच नाही तर, पंतप्रधान मोदींचे जगभरातील स्पोर्टिंग आयकॉन्सपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. यात विराट कोहली (६४.१ मिलियन), ब्राझीलचा फुटबॉल स्टार नेमार जूनियर (६३.६ मिलियन), अमेरिकन बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स (५२.९ मिलियन ) यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी टेलर स्विफ्ट (९५.३ मिलियन), लेडी गागा (८३.१ दशलक्ष) आणि किम कार्दशियनचे (७५.२ मिलियन ) फॉलोअर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज आणि उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

अंबरनाथ नगरपालिकेत नवा ट्विस्ट; भाजपच्या खेळीवर शिंदेसेनेची कुरघोडी

Zodiac predictions: आज कोणाचा दिवस उजळणार? जाणून घ्या १० जानेवारीचं पंचांग आणि राशीविशेष

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT