मोदी व शहांनी राष्ट्रपतींची लागोपाठ भेट घेऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.
मंत्रिमंडळ फेरबदल, भाजपमध्ये संघटनात्मक बदल आणि नवे अध्यक्ष यावर चर्चा.
उज्ज्वल निकम यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता, गिरीश महाजन यांचं सूचक विधान.
पावसाळी अधिवेशनात मोठी विधेयके येण्याची शक्यता. बैठकीमागे ही तयारी कारणीभूत?
दिल्लीच्या राजकारणात लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ३ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. एकाच दिवशी लागोपाठ घेतलेल्या या दोन महत्त्वपूर्ण भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मंत्रिमंडळ फेरबदल होणार का? भाजपच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल होणार का? अशी चर्चा रंगली आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी अॅड. निकम यांच्याबाबत केलेलं सूचक विधान खरे होणार का? अशा अनेक प्रश्नांनी राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातला आहे.
सध्या दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चेदरम्यान, देशातील ४ प्रमुख मंत्र्यांची खाती बदलली जाणार असल्याचं बोललं जात आहे.
यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नवा चेहरा ठरवणे, उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार कोण? भाजपमधील संघटनात्मक बदल; या मुद्द्यांवर चर्चा झाली असावी, असा अंदाज आहे. रविवारी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मोदींनी भेट घेतली. नंतर काही वेळाच्या अंतरानं गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली.
महत्वाच्या भेटीत अमेरिकेनं भारतावर लादलेले आयात शुल्क, केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल, ऑपरेशन सिंदूरवर संसदेत सुरू असलेली चर्चा, या विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू असलेली मतदारयादीची सुधारणा तसेच संसदेत होत असलेल्या घडामोडी या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अलिकडेच ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाता वर्णी लागू शकते, या चर्चेनं जोर धरला आहे. याबाबत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक शब्दांत वक्तव्य केलं होतं. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर गिरीश महाजन यांनी काहीही अशक्य नाही, अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे मोदी - शहा यांनी राष्ट्रपतींसोबत घेतलेल्या बैठकीत या विषयावरही चर्चा झाली असावी, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.