PM Kisan : PM नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या पाठवणार पैसे  Saam Tv
देश विदेश

PM Kisan चे 2000 रुपये खात्यात आले नाहीत? त्वरित ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

९ऑगस्ट २०२१ रोजी ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पीएम- किसान PM Kisan Yojna योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या Farmer खात्यामध्ये दरवर्षी ६ हजार रुपये जमा केले जात आहे. ४ महिन्यामध्ये एकदा अशी ३ हफ्त्यात ही रक्कम दिली जाणार आहे. पीएम- किसान योजनेंतर्गत आतापर्यंत १.३८ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. याअगोदर मे महिन्यामध्ये ९ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा करण्यात आली आहे. आता पंतप्रधान PM शेतकरी सन्मान निधीचा नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. ९ऑगस्ट २०२१ रोजी ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

मात्र असे काही शेतकरी आहेत, ज्यांनाअद्याप ही मदत मिळालेली नाही आहे. जर तुम्ही देखील त्या शेतकऱ्यांपैकी एक असाल, ज्यांच्या खात्यात अद्याप २००० रुपये जमा झाले नाही, त्यांनी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही.

हे देखील पहा -

सरकारने काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत त्यावर आपण संपर्क साधून तक्रार दाखल करू शकता. याशिवाय तुम्ही लेखापाल अथवा कृषी विभागाशी देखील संपर्क करू शकता. इथे देखील तुमचे काम न झाल्यास या योजनेकरता सरकारने काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत त्या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तक्रार दाखल करू शकता.

पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर असणाऱ्या हेल्पलाइन नंबर ०११-२४३००६०६ / ०११-२३३८१०९२ यावर संपर्क करू शकता. याशिवाय तुम्ही सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्क चा ई-मेल pmkisan-ict@gov.in यावर देखील संपर्क करू शकता.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT