मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच; दारु रिचवणारे कोण?

मंत्रालयात या दारुच्या बाटल्या आल्याच कशा
मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच; दारु रिचवणारे कोण?
मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच; दारु रिचवणारे कोण?
Published On

ज्या मंत्रालयातून (Mantralay) राज्याचा कारभार चालवला जातो त्याच मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच पडल्याचे आढळून आले आहे. मंत्रालयात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते. पासशिवाय कोणालाच मंत्रालायात प्रवेश दिला जात नाही. पण याच मंत्रालायात दारुच्या बाटल्यांचा खच आढळून आल्याने मंत्रालयात खळबळ माजली आहे. (A pile of liquor bottles in the ministry)

मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच; दारु रिचवणारे कोण?
बेकायदा बांधकामांच्या कारवाईला असलेली स्थगिती ३० ऑगस्टपर्यंतच

धक्कादायक म्हणजे, संपुर्ण मंत्रालयात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असताना या दारुच्या बाटल्या आल्या कुठुन, त्या कोणी आणल्या, आणि कोणासाठी आणल्या, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मंत्रालायात संपुर्ण राज्याचा कारभार चालवला जातो. मंत्रालय राज्याच मुख्यालय आहे. याठिकाणा लोक त्यांचे प्रश्न, समस्या, अडचणी मांडण्यासाठी येत असतात.

हे देखील पहा

सर्वसामान्य माणसाला मंत्रालयात प्रवेश घ्यायचा असेल तर मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणांनी परवानगी दिल्याशिवाय आणि कसुन चौकशी केल्याशिवाय कोणालाही आत प्रवेश मिळत नाही. मग मंत्रालयात या दारुच्या बाटल्या आल्याच कशा, असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.


साम टिव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर लगेचच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तिथे पोचून दारूचा खच उचलायला सुरुवात केली. त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.

तर दुसरीकडे राज्याचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनीदेखील या घटनेचा निशेष केला आहे. मंत्रालयासारख्या ठिकाणी जिथे लोक आपल्या समस्या, अडचणी घेऊन येतात, ज्या मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी कसून तपासणी केली जाते , त्या मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच आढळून येणे ही अत्यंत चीड आणणारी आणि निंदनीय बाब आहे. कोनरोनाची, पुरपरिस्थिती असताना मंत्रालयात दारुच्या बाटल्या कोणी आणल्या आणि कशा आणल्या याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

याशिवाय हे सरकार कोणासाठी काम करतयं, धनदांडग्यांसाठी करतंय, दारुविक्रेत्यांसाठी करतंय की, रेस्टॉरंट, बार वाल्यांसाठी करतय की सर्वसामान्य माणसांसाठी करतंय याचे उत्तर महाराष्ट्राला मिळालेच पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com