Supreme Court  Saamtv
देश विदेश

New Parliament Building: नव्या संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात! राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन व्हावं... जनहित याचिका दाखल

Plea in Supreme Court On new parliament building: राष्ट्रपतींना आमंत्रित न करून संविधानाचे उल्लंघन केले असल्याचंही या याचिकेत म्हटलं आहे.

Gangappa Pujari

New Parliament Building Inauguration by PM Modi : २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. मात्र, या सोहळ्यापूर्वीच नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करावे, अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली आहे. याबद्दलची महत्वाची बातमी समोर येत असून याविरोधात सुप्रिम कोर्टातही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

सुप्रिम कोर्टात याचिका दाखल...

याबाबत अधिक माहिती अशी की, संसदेच्या नव्या इमारतीचं २८ मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार असून त्याआधीच विरोधकांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करत २० पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. आता हे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावं, अशी मागणी करणारी जनहित याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

सीआर जया सुकीन यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होण्याकरता लोकसभा सचिवालयाला दिशा, निरीक्षण किंवा सूचना देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच लोकसभा सचिवालयाने राष्ट्रपतींना आमंत्रित न करून संविधानाचे उल्लंघन केले असल्याचंही या याचिकेत म्हटलं आहे. (Latest Marathi News)

या पक्षांनी दर्शविला विरोध...

दरम्यान, काँग्रेस, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम), आप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), समाजवादी पक्ष, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची, आरएलडी, टीएमसी, जेडीयू, NCP, सीपीआय(एम) यांचा समावेश आहे. ), RJD, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (MDMK) या पक्षांनी कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लातूरमध्ये पावसाचा हाहाकार! अनेकांचे संसार उघड्यावर; दोन गावांना पुरानं वेढलं, ७० शेळ्या, ७ बैल वाहून गेले

Heavy Rain : अकोला जिल्ह्याला पावसाने झोडपले; गावांमध्ये शिरले पाणी, वाडेगाव ते बाळापुर वाहतूक बंद

आर्थिक अडचण आलीय? UPI दूर करणार तुमची समस्या, बँकेत न जाता मिळेल Loan

Thane : मोठी बातमी! मंगळवारी पावसाचा रेड अलर्ट, ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी

INDIA Alliance vs Election Commission:मतचोरीचा वाद टोकाला! इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आणणार महाभियोग, काय असते प्रक्रिया?

SCROLL FOR NEXT