Scientists Grow Plants in Lunar Soil
Scientists Grow Plants in Lunar Soil Twitter/@NASA
देश विदेश

चंद्राच्या मातीतून उगवलं रोपटं! भविष्यात चंद्रावर शेती शक्य?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वॉशिंगटन : गेल्या अनेक दशकांपासून मानव हा अंतराळ क्षेत्रात अनेक मोहिमा आखत आहे. अनेक मोहिमेत मानवाला यशही मिळालं आहे. पृथ्वीशिवाय अंतराळातल्या इतर ग्रहांवर राहता येईल का यासाठीही मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांना (Scientists) यात आणखी एक मोठं यश मिळालं आहे. अमेरिकेतील प्लोरिडा विद्यापीठाच्या (University of Florida) वैज्ञानिकांनी चंद्रावरच्या मातीत (Lunar Soil) रोपटं (Plant) उगवण्याचं ऐतिहासिक कार्य केलं आहे. त्यामुळे अंतराळ क्षेत्रातलं हे एक मोठं यश मानलं जात आहे. (Plants grown from the soil of the moon! Is it possible to farm on the moon in the future?)

हे देखील पाहा -

कम्युनिकेशन्स बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात शास्त्रज्ञांनी सांगितले की, वनस्पती केवळ पृथ्वीच्या मातीतच नाही तर अवकाशातून आलेल्या मातीतही वाढू शकतात. या अभ्यासात, शास्त्रज्ञांनी चंद्रावरील मातीचे (लूनर रेगोलिथला) वनस्पतींच्या जैविक प्रतिसादाचे परीक्षण केले. चंद्रावर अन्न आणि ऑक्सिजनसाठी शेती करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे.

फ्लोरिडा विद्यापीठाच्या प्रोफेसर अॅना-लिसा पॉल यांनी सांगितले की, या प्रयोगापूर्वीही चंद्राच्या मातीत वनस्पती वाढवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर त्या झाडांवर केवळ चंद्राची माती शिंपडण्यात आली. अलीकडच्या संशोधनात ही वनस्पती चंद्राच्या मातीत पूर्ण वाढलेली आहे.

संशोधकांनी रोपटे वाढवण्यासाठी ४ प्लेट्स वापरल्या. यामध्ये असे पोषक तत्व पाण्यात मिसळले होते जे चंद्राच्या मातीत सापडत नाहीत. यानंतर, या द्रावणात अरबीडोप्सिस वनस्पतीच्या बिया रोवल्या. काही दिवसातच या बियांपासून लहान रोपटे उगवले.

नासाच्या अपोलो मोहिमेतील ६ अंतराळवीर ३८२ किलो वजनाचे दगड घेऊन चंद्रावरून पृथ्वीवर परतले होते. हे दगड शास्त्रज्ञांमध्ये वाटण्यात आले. फ्लोरिडा विद्यापीठाचे प्रोफेसर रॉबर्ट फेरी यांच्या म्हणण्यानुसार, ११ वर्षांत ३ वेळा अर्ज केल्यानंतर त्यांना नासाकडून (NASA) १२ ग्रॅम माती मिळाली. एवढ्याश्या मातीत काम करणं खूप अवघड होतं, पण अखेरीस ते रोप वाढवण्यात यशस्वी झाले. अपोलो ११, १२ आणि १७ मोहिमेदरम्यान ही माती गोळा करण्यात आली होती.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

Maharashtra Tourism: सूर्य आग ओकतोय! उष्णतेच्या झळा थंड हवेच्या ठिकाणांनाही, पर्यटकांनी फिरवली पाठ

PM Narendra Modi: अभिजीत पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट, देश आणि राज्यातील विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

India T20 World Cup Squad : किंग कोहलीवर विश्वास कायम, पंत आणि चहलचंही कमबॅक; टी-20 वर्ल्डकप टीमबाबत ५ महत्वाचे मुद्दे

PM Narendra Modi आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक अभिजीत पवार यांची नवी दिल्लीत भेट

SCROLL FOR NEXT