Twitter Deal On Hold By Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विट केले आहे की ट्विटर (Twitter) डील अद्याप होल्डवर आहे. मस्क यांनी नुकतीच मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर सुमारे $ 44 अब्ज मध्ये विकत घेण्याची करण्याची घोषणा केली होती, मात्र आता ही डील होल्डवर गेल्याने ट्विटरला शेयर बाजारात मोठा धक्का बसू शकतो. (Twitter deal temporarily on hold pending details supporting calculation that spam/fake accounts do indeed represent less than 5% of users)
हे देखील पाहा -
मस्क यांनी शुक्रवारी सांगितले की, स्पॅम आणि बनावट खात्यांवरील चालू तपशीलांचा हवाला देऊन ट्विटरसाठीचा त्यांचा $44 अब्ज करार तात्पुरता थांबवण्यात आला आहे. मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "ट्विटरने म्हटले होते की, ट्विटरवर 5% टक्क्यांपेक्षा कमी स्पॅम आणि फेक अकाऊंट्स आहेत." (Elon Musk Hold Twitter deal)
मस्कच्या घोषणेपूर्वी, ट्विटरने गुरुवारी आपल्या दोन व्यवस्थापकांना काढून टाकले होते. सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांनी कर्मचाऱ्यांना केलेल्या ई-मेलमध्ये ब्रूस फॉक आणि केव्हॉन बेकपौर यांना ट्विटरवरून काढून टाकल्यानंतर कंपनीच्या सद्यस्थितीची माहिती दिली. कंपनीतील बदल आणि बजेट आदी समस्यांमुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचे मेलमध्ये सांगण्यात आले आहे.
शेयर बाजारात ट्विटरची घसरण होण्याची शक्यता
ट्विटरचा करार होल्डवर ठेवल्याची माहिती मिळताच, ट्विटरच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. प्री-मार्केट ट्रेडिंगमध्येच कंपनीचे शेअर्स जवळपास 20% घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी एका फर्मने ट्विटर आणि मस्क यांच्यातील डीलबाबत असा अंदाज व्यक्त केला होता.
अलीकडेच केली होती ट्विटर विकत घेण्याची घोषणा
अलीकडेच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरला एलॉन मस्कने 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले होते. मस्कने ट्विटरच्या प्रत्येक शेअरसाठी $54.20 दिले. सिक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशनकडे दाखल केलेल्या दस्तऐवजांवरून असे दिसून आले आहे की, रिव्होकेबल ट्रस्टच्या माध्यमातून मस्कचे ट्विटरचे 73,486,938 शेअर्स म्हणजेच 9.2 टक्के शेअर्स आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.