मुंबई: मे महिन्याची आजची १३ तारिख आहे. यानंतर १४, १५ आणि १६ मे ला बॅंका बंद राहणार आहेत. या तीन दिवस देशभरातल्या बॅंका (Bank) बंद राहणार आहेत. १४ तारखेला दुसरा शनिवार, १५ तारखेला रविवार आणि १६ तारखेला सोमवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी. त्यामुळे एका-पाठोपाठ एक अशा तीन दिवस सुट्ट्या (Holidays) असल्यामुळे तीन दिवस बॅंका बंद राहणार आहेत. भारतात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बॅंका बंद असतात. त्यामळे या महिन्यात बॅंकेची कामं लवकरात-लवकर आटपून घेणं हे फायद्याचं असेल. (Finish the work of the bank; Banks closed for next three days)
हे देखील पाहा -
मे महिन्यात एकूण ११ दिवस सुट्ट्या आहेत, त्यापैकी पाच सुट्ट्या संपल्या असून सहा सुट्ट्या शिल्लक आहेत. यामध्ये आता बुद्ध पौर्णिमा आणि वीकेंडच्या सुट्ट्या आहेत. यापूर्वी २ मे ला रमजान-ईद किंवा ईद-उल-फित्रची सुट्टी होती. ३ मे ला अक्षय्य तृतीया, परशुराम जयंती आली होती. त्याचबरोबर रविवारच्या दोन सुट्याही गेल्या आहेत. त्यानुसार आता १४, १५, १६, २२, २८ आणि २९ या तारखेला सुट्ट्या असल्याने बॅंका बंद राहणार आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.