Plane Crash सोशल मीडिया
देश विदेश

Plane Crash: आणखी एक विमान अपघात, ८० जणांना घेऊन जाणारे प्लेन लँडिंगवेळी क्रॅश, अनेकजण जखमी

Plane Crash: टोरंटो विमानतळावर लँडिंगवेळी मोठी दुर्घटना घडली आहे. डेल्टा एअरलाइन्सचे विमान लँडिंगवेळी क्रॅश झाले. प्लेनमधून ८० जण प्रवास करत होते.

Namdeo Kumbhar

Delta Airlines Plane Crash : डेल्टा एअरलाइन्सचे विमान लँडिंगवेळी टोरंटो विमानतळावर पलटी झाले. फ्लाइट क्रमांक 4819 हे विमान मिनियापोलिस-सेंट पॉल एअरपोर्ट ते टोरंटो पियर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर जात होते. टोरंटो पियर्सन विमानतळावर लँडिंगवेळी विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमानात ८० जण होते, त्यामध्ये ७६ प्रवाशी होते. दुर्घटनाग्रस्त विमानातानू सर्वांना बाहेर काढण्यात आलेय. या अपघातात कुणाचाही मृत्यू झाला नाही, पण अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, डेल्टा एअरलाइन्सचे विमानाचे टोरंटो पियर्सन विमानतळावर लँडिंगवेळी कंट्रोल सुटले. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच विमानतळावर आपातकालीन पथक तात्काळ घठनास्थळी दाखल झाले अन् प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.

१५ जण जखमी -

दुर्घटनाग्रस्त विमानातून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत कुणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. आतापर्यंत १५ जणांना दुखापत झाल्याचे वृत्त आहे. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. गंभीर जखमी झालेल्या ६० वर्षीय व्यक्तीला टोरंटो येथील सेंट मायकल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. अन्य एका व्यक्तीला सनीब्रुक हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेय.

लँडिंगवेळी विमान नेमकं कोणत्या कारणामुळे पलटी झाले, याबाबतची अद्याप कोणताही सविस्तर माहिती मिळालेली नाही. विमान नेमक पलटी कसं झाले, ही दुर्घटना का झाली? त्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आलेय. कॅनडामधील सुरक्षा बोर्ड याची सखोल चौकशी करणार आहे. दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे झाली? त्याची माहिती जाणून घेण्यासाठी चौकशी पथक स्थापन करण्यात आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT