Portugal Flight News
Portugal Flight News Saam Tv
देश विदेश

अरे देवा! विमान जाणार होते पोर्तुगालला पण पोहोचले स्पेनला, पुढे जे झालं ते वाचून व्हाल थक्क

साम वृत्तसंथा

युरोपमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक विमान (Plane) पोर्तुगालला जाणार होते, पण ते विमान स्पेनला पोहोचले. नंतर मोठ्या हा प्रकार समोर आल्यानंतर प्रवाशांना बसने सीमा ओलांडून पोर्तुगालला पाठवण्यात आले. तुमचा या प्रकारावर विश्वास बसणार नाही पण ही घटना खरी आहे. ही संपूर्ण घटना एका प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

ही सर्व घटना बॅरी मास्टरसन नावाच्या प्रवाशाने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. हे विमान रायनायरचे होते. पोर्तुगाल येथे उतरणार होते. पण प्रत्यक्षात ते स्पेनमधील मालागा येथे उतरले. यात प्रवाशांची चूक होती असे नाही आणि तो चुकून दुसऱ्या फ्लाइटमध्ये (Plane) बसले असंही नाही, ही सर्व चूक विमानातील (Plane) कर्मचाऱ्यांची होता.

बसमध्ये होते १५७ प्रवासी

हे विमान डब्लिनहून निघाल्याचा दावा बॅरी यांनी केला. पण ते विमान अपेक्षेप्रमाणे फारो येथे उतरले नाही. यानंतर सर्व १५७ प्रवाशांना बसमधून सोडण्यात आले. पाच तासांच्या प्रवासानंतर प्रवाशांना पोर्तुगालला पाठवण्यात आले. सर्व प्रवाशांना एकाच बसमध्ये (BUS) बसवल्याचा दावाही बॅरी यांनी केला. या सर्वांना सीमेवर दुसऱ्या बसमध्ये बसवण्यात आले.

विमानाचा (Plane) हा गोंधळ का झाला यावर प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. या संदर्भात कंपनीने निवेदन जारी केले आहे. फ्रेंच एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपामुळे हे विमान वळवावे लागले. विमान कंपन्यांनी ते पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे सांगितले. १६ सप्टेंबर रोजी झालेल्या या संपामुळे अनेक उड्डाणे इतर शहरांकडे वळवावी लागली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Crop : भाव नसल्याने केळी बाग उपटून फेकली; सर्व खर्च गेला वाया

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये मोठी घडामोड; हेमंत गोडसेंच्या प्रचारात छगन भुजबळ सहभागी होणार का? स्वत:च सांगितलं

Budget Friendly Car: टॉप सिक्युरिटी, जबरदस्त फिचर; मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या ५ कार

Sonalee Kulkarni Anniversary: सोनालीच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण; सेलिब्रेशनचे फोटो पाहा

Onion Export News | निर्यातबंदी उठूनही कांदा शेतकऱ्यांची अडचण, कस्टमच्या साईटमुळे गोंधळ

SCROLL FOR NEXT