PCU Opens Advanced Centre of Excellence 
देश विदेश

Pune : पुण्यात तंत्रज्ञानाची नवी क्रांती! पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये १६ हायटेक प्रयोगशाळा सुरू

पिंपरी चिंचवड विद्यापीठाने इंडस्ट्री 5.0 आणि फ्युचर टेक्नॉलॉजीजसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे. 16 अत्याधुनिक प्रयोगशाळांमधून AI, रोबोटिक्स, EV, सेमीकंडक्टर, IoT आणि डिजिटल ट्विनसह विविध तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Namdeo Kumbhar

PCU future technologies advanced laboratories : पिंपरी चिंचवड विद्यापीठाने (PCU) भविष्यातील तंत्रज्ञानाधारित शिक्षण, उद्योगाभिमुख कौशल्यविकास आणि संशोधनाला चालना देण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यापीठात 'सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) इन इंडस्ट्री ५.० अँड फ्युचर टेक्नॉलॉजीज'चे भव्य उद्घाटन करण्यात आले. अत्याधुनिक प्रयोगशाळा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रातील भागीदारी आणि संशोधनाच्या संधी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे हे सेंटर विद्यार्थी, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

दिग्गजांची उपस्थिती

या उद्घाटनप्रसंगी पीसीयूचे कुलपती व गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, गव्हर्निंग बॉडीचे सदस्य प्रतापराव पवार, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पांडुरंग लांडगे, अध्यक्षा पद्मा मालोजी भोसले, सचिव विठ्ठल सोमाजी काळभोर, व्यवस्थापन प्रतिनिधी नरेंद्र लांडगे व अजिंक्य काळभोर, फोर्ब्स मार्शलचे प्रमुख राजेश मधुसूदन पाटील, पुणे जिल्हा शिकलगार समाज सेवा संघाचे अध्यक्ष सलीम शिकलगार, डिजिप्लेक्स रोबोटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित गेट, लिआम, गजानन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Pimpri Chinchwad University Industry 5.0 Centre of Excellence

१६ अत्याधुनिक प्रयोगशाळांची निर्मिती

या सेंटर ऑफ एक्सलन्सअंतर्गत एकूण १६ अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये इंडस्ट्रियल ऑटोमेशन, इंडस्ट्रियल मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल रोबोटिक्स, स्मार्ट फॅक्टरी ऑटोमेशन विथ IIoT, डिजिटल ट्विन, AI रोबोटिक्स अँड मशीन लर्निंग, इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी, ड्रोन टेक्नॉलॉजी, सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग आणि AI अँड अडॅप्टिव्ह कॉम्प्युटिंग यांसारख्या प्रगत लॅब्सचा समावेश आहे.

Pimpri Chinchwad University Industry 5.0 Centre of Excellence

जागतिक दर्जाच्या कंपन्यांचे सहकार्य

यातील पहिल्या १३ प्रयोगशाळा 'Digitech Robotics India Private Limited'च्या सहकार्याने विकसित करण्यात आल्या आहेत. 'High-Performance Computing Lab' ही C-DAC पुणे यांच्या सहकार्याने, तर 'AI & Adaptive Computing Lab' ही AMD या जागतिक कंपनीच्या सहकार्याने स्थापन करण्यात आली आहे. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या अत्याधुनिक सुविधांचा उपयोग उद्योग प्रशिक्षण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कौशल्यविकास, तसेच विद्यार्थी व उद्योगांसाठी संयुक्त संशोधनासाठी केला जाईल.

कार्यक्रम प्रसंगी डॉ. उमेश पोतदार यांनी टाटा मोटर्स (Tata Motors) डिप्लोमा प्रोग्राम तसेच केनिया व झांझिबार येथील विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित कौशल्यविकास कार्यक्रमाची माहिती दिली. तर श्री. रामकृष्ण वडाली यांनी C-DAC आणि AMD च्या सहकार्याने सुरू होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

इंडस्ट्री ५.० च्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञान, मानवी कौशल्ये आणि नवोन्मेष यांचा समन्वय साधण्यावर भर दिला जात आहे. पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे हे सेंटर ऑफ एक्सलन्स विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करणारे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Forest Cake Recipe: घरच्या घरी बनवा बेकरीसारखी चव स्वादिष्ट व्हाईट फॉरेस्ट केक, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून १८० विमान प्रवाशांचे जीव वाचविण्याऱ्या पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांचे कौतुक

Mens Fitness : पुरुषांनो! वयाची ४५ वर्षे पूर्ण केलीत, 'या' ३ गोष्टी करू शकलात तर समजा तुम्ही आहात फिट अँड फाईन

आता प्रधानांच्या प्रधानचा राजीनामा; अभिजीत दीपकेंची मुंबईतून मोठी घोषणा

Pitru Paksha : पितृपक्षात फक्त कावळा नाही तर 'या' प्राण्याला खाऊ घालणं शुभ मानलं जात

SCROLL FOR NEXT