Plane Crash Saam TV Marathi
देश विदेश

Plane Crash : खेळाडूंना घेऊन जाणारे विमान झाडांवर कोसळले; ५ जणांचा मृत्यू

plane crash pickleball player Death : अमेरिकेतील टेक्सासमध्ये पिकलबॉल खेळाडूंना घेऊन जाणारे छोटे विमान झाडांवर कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पायलटसह ५ जणांचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

पिकलबॉल खेळाडूंना घेऊन जाणारे एक छोटे विमान रात्री अचानक झाडांवर कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. विमानाचा स्फोट झाल्यामुळे वैमानिक (पायलट) आणि ४ खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला. अमेरिकेतील टेक्सासजवळील विम्बर्ली येथे हा अपघात झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दुर्घटनेमुळे अमेरिकेतील पिकलबॉल खेळाडूंवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अपघातापूर्वी परिसरातील हवामान ढगाळ होते आणि राष्ट्रीय हवामान विभागाने वादळी पावसाचा इशाराही दिला होता.

सेसना ४२१ सी हे विमान अमॅरिलो येथून निघाले होते. ते न्यू ब्रॉनफेल्स प्रादेशिक विमानतळाकडे जात असताना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विम्बर्ली येथील घनदाट जंगलात कोसळले. टेक्सासमधील सार्वजनिक सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विमान झाडांवर कोसळल्यामुळे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सध्या केंद्रीय यंत्रणा या अपघाताचा तपास करत आहेत.

या दुर्घटनेत वैमानिक आणि ४ प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती सार्जंट बिली रे यांनी दिली. अमॅरिलो पिकलबॉल क्लबने सांगितले की, विमानात असलेले सर्वजण न्यू ब्रॉनफेल्स येथील 'क्रँकी पिकल' या स्पर्धेसाठी जात होते. मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजकांनी शुक्रवारी होणारी ही स्पर्धा रद्द केली आहे.

विमान कोसळण्यापूर्वी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या (ATC) ऑडिओमध्ये चिंतेचा सूर ऐकू येत होता. विमान अनियंत्रित झाले होते आणि काही वेळातच रडारवरून गायब झाले होते. "विमानाशी संपर्क तुटला आहे, सर्व काही ठीक आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे," असे एका नियंत्रकाने म्हटले होते.

अमॅरिलो पिकलबॉल क्लबचे अध्यक्ष डॅन डायर म्हणाले की, "मी अपघातातील सर्व मृतांना ओळखत होतो. त्यांच्यासोबत मी खेळलोही आहे आणि त्यांना पदकेही दिली आहेत. ते सर्व उत्कृष्ट खेळाडू होते आणि नेहमी जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरत असत. दर आठवड्याला अशा अनेक स्पर्धा असतात. एकदा का या खेळाची चटक लागली की, खेळाडू स्पर्धेसाठी दूरवर प्रवास करायलाही मागेपुढे पाहत नाहीत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

SCROLL FOR NEXT