Collapsed buildings and rescue operations after the powerful 6.9 magnitude earthquake in the Philippines. 
देश विदेश

भूकंपामुळे मध्यरात्री जमीन हादरली, २६ जणांचा मृत्यू, लोकांचा आक्रोश अन् घर पडतानाचा व्हिडिओ

Philippines earthquake death toll : फिलिपिन्समध्ये ६.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे. १५० हून अधिक जखमी आहेत. इमारती कोसळल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Namdeo Kumbhar

Philippines earthquake today 6.9 magnitude : फिलिपिन्स देश मंगळवारी रात्री उशिरा भूकंपाने हादरला. ६.९ रेश्टर स्केलच्या भूकंपाने फिलिपिन्समध्ये हाहाकार माजवला. नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर १५० जण जखमी झाले आहेत. भूकंप होत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भूकंपाची तीव्रता पाहाता मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (Powerful 6.9 Magnitude Earthquake Strikes Philippines, 26 Dead and 150 Injured)

मंगळवारी रात्री उशिरा फिलिपिन्स भूकंपामुळे हादरले. तीव्र भूकंपाच्या धक्क्यामुळे इमारती कोसळल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. ६.९ तीव्रतेच्या भूकंपामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. नागरिकांचा आक्रोश अनेक कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जिवाच्या आकांताने नागरिक घराबाहेर पळतानाचे व्हिडिओत दिसत आहे. त्यांचा आक्रोशाचा आवाज काळजाला चीर करणारा आहे.

भूकंप झाला तेव्हाचा लाईव्ह व्हिडिओ समोर आलाय, पाहा

६.९ रेश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५० जण जखमी आहेत. काहीजण इमारतीच्या मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. फिलिपिन्समधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, मलब्याखाली दबलेल्या लोकांना काढण्याचे काम प्रगतिपथावर आहे. परिस्थिती पाहता मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण United States Geological Survey (USGS) यांच्या अंदाजानुसार, या भूकंपाचा केंद्र बिंदू सेबू प्रांताच्या बोगो शहरापासून १९ किमीवर होता. शक्तिशाली भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे फिलिपिन्सवर दुहेरी संकट ओढावलेय. दरम्यन, ६.९ रेश्टर स्केल भूकंपाची माहिती मिळताच तात्काळ बचाव पथके प्रभावित परिसरात दाखल झाली असून मदतकार्य वेगात सुरू आहे. प्रशासनाकडून सर्तक राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT