Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

kalyan school News : शाळेच्या अजब फतव्यानंतर संतप्त पालकांनी शिक्षण विभागाकडे धाव घेतली आहे. महापालिकेकडून शाळेला नोटीस, लवकरच प्रत्यक्ष शाळेत जाऊन शहानिशा करत कारवाई करणार आहेत.
Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा, कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी-बांधणीवर बंदी
Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा, कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी-बांधणीवर बंदीsaam TV Marathi news
Published On

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

कल्याण मधील एका नामांकित शाळेचा अजब फतवा सध्या वादाचा विषय ठरत आहे. श्रीमती कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूल प्रशासनाने विद्यार्थ्यांनी कपाळावर टिळा किंवा टिकली लावणे, तसेच विद्यार्थिनींनी राखी अथवा धागा बांधणे यावर बंदी घातली आहे. यामुळे संतप्त पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली असून, शिक्षण विभागानेही शाळेला नोटीस बजावून लवकरच शाळेत जाऊन कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांनी टिळा-टिकली लावू नये, हातात धागा अथवा बांगड्या घातल्यास शिक्षा होईल असा कल्याणातील के सी गांधी शाळेने अजब फतवा काढला आहे. विद्यार्थ्यांनी हातात कोणताही धागा बांधू नये, विद्यार्थिनींनी बांगड्या घालू नये असा नियम शाळेने केला आहे. त्याचे पालन करावे अन्यथा शिक्षा दिली जाईल असं शाळेने म्हटलं आहे. तक्रारी नंतर केडीएमसी ने शाळेला नोटीस नोटीस काढले आहे व खुलासा करण्याचे आदेश दिले आहे.

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा, कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी-बांधणीवर बंदी
Mumbai News : बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा, ६ जणांनी लाखो रूपयांवर केला हात साफ

या निर्णयाविरोधात पालकांनी ठाकरे गटाचे कल्याण विधानसभा संघटक रुपेश भोईर यांच्याकडे तक्रार केली आहे. रुपेश भोईर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाकडे तक्रार केली. कल्याण डोंबिवली मनपा शिक्षण विभागाने या घटनेची तातडीने दखल घेत शाळेला नोटीस पाठवून तातडीने खुलासा मागितला आहे. काही पालकांनी उबाठा गटाकडे या प्रकरणासंबंधी तक्रार केली त्यानंतर शिक्षण शिक्षण विभागाला पत्रव्यवहार केला व शिक्षण विभागाने शाळेकडे खुलासा मागितला आहे आज ११ वाजता शाळेकडे खुलासा विचारण्यासाठी पालक शिवसेना पदाधिकारी व शिक्षण विभागाती अधिकारी जाणार आहे.

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा, कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी-बांधणीवर बंदी
Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com