crime Saam
देश विदेश

Shocking: 'त्याने माझा वापर करून सोडलं', बड्या खासदारावर उच्चशिक्षित महिलेचा गंभीर आरोप; पोस्ट करत पत्ते उघड

Bhim Army Chief Chandrashekhar Azad: मध्य प्रदेशातील इंदूर येथील पीएचडी स्कॉलर डॉ. रोहिणी घवारी हिनं लोकसभा खासदार आणि भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर गंभीर आरोप करत टीकास्त्र डागलं आहे.

Bhagyashree Kamble

मध्य प्रदेशातील इंदूर येथील पीएचडी स्कॉलर डॉ. रोहिणी घवारी हिनं लोकसभा खासदार आणि भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली. रोहिणीने पोस्टमध्ये, ती चंद्रशेखरची पीडिता क्रमांक ३ असल्याचं सांगितलं. तसेच चंद्रशेखर आणि त्यांच्या कुटुंबाने शोषण केले असल्याचा आरोप महिलेनं केला. ही घटना उघडकीस झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

डॉ. रोहिणी घवारी पीएचडी स्कॉलर आहे. इंदुरच्या बीमा रूग्णालयात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची ती मुलगी आहे. २०१९ साली ती उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला गेली होती. दरम्यान, शिक्षण घेत असताना तिची ओळख चंद्रशेखर यांच्यासोबत झाली. दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले, नंतर ३ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यात बिनसलं होतं. यानंतर आता तिनं नुकतंच एक्स पोस्टवर चंद्रशेखर यांच्यावर गंभीर आरोप करत पोस्ट शेअर केली.

दरम्यान, तिने दोन पोस्ट शेअर केल्या असून, पहिल्या पोस्टमध्ये तिने लिहिले, "चंद्रशेखर हा दलित समाजासाठी एक कलंकित नेता आहे. एकीकडून फसवून दुसरीकडे, आणि तिसरीकडे जाणं ही त्याची सवय आहे. फसवणूक आणि विश्वासघात हे त्याच्या रक्तातच आहे." अशा शब्दांत रोहिणीने आझाद यांच्यावर सडकून टीका केली.

यानंतर तिने दुसरी पोस्ट शेअर करत बरेच गंभीर आरोप केले आहेत. "चंद्रशेखरने मला वापरून टाकलं. बहिणी-मुलींच्या सन्मानाला त्याच्यासाठी काहीही किंमत नाही. बहुजन चळवळीच्या नावावर दलित समाजातील महिलांच्या विश्वासाशी खेळ केला जात आहे." तसेच, "गेल्या दहा वर्षांत त्याने समाजासाठी एकही चांगलं काम केलं नाही आणि भविष्यातही करणार नाही. भाजपच्या कृपेने तो खासदार झाला, पण खरा समाजनेता तो कधीच बनू शकणार नाही", असेही तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

'दलित-मुस्लिम मतं विभागण्यासाठी, भाजप त्याचा वापर करेल आणि २०२७ च्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत त्याला फेकून देईल. एके दिवशी त्याला स्त्रीचे जीवन उध्वस्त केल्याबद्दल नक्कीच शिक्षा मिळेल! मी त्या दिवसाची वाट पाहत आहे! ३ जून २०२१ हा माझ्या आयुष्यातील दुर्दैवी दिवस आहे', असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ladki Bahin Yajana : लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय, VIDEO

Bhai Dooj 2025: आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

Bhaubeej Marathi Wishes: भाऊ-बहिणीच्या नात्याचा खास सण! लाडक्या भाऊरायाला पाठवा 'या' खास शुभेच्छा

Budh Gochar: उद्या बुध ग्रह करणार राशीत बदल; दिवाळीमध्ये 'या' 3 राशींची होणार चांदीच चांदी

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

SCROLL FOR NEXT