Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Prices : वाहनधारकांना दिलासा! 'या' शहरात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोएडा शहरात आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले

साम टिव्ही ब्युरो

Petrol Diesel Prices : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराचा परिणाम देशांतर्गत बाजारात सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारी सकाळी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे (Diesel) नवे दर जारी केलेत. त्यानुसार, उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोएडा शहरात आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले, तर बिहारची राजधानी पाटणामध्येही दरात वाढ झाली आहे. (Petrol Diesel Prices Today)

देशातील चार महानगरांमध्ये सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आजही कोणताही बदल झालेला नाही. मात्र, उत्तरप्रदेशच्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल 11 पैशांनी स्वस्त होऊन 96.65 रुपये आणि डिझेल 11 पैशांनी स्वस्त होऊन 89.82 रुपये प्रति लिटर झाले आहे.

दुसरीकडे, बिहारच्या पाटणामध्ये पेट्रोल 35 पैशांनी 107.59 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 32 पैशांनी 96.36 रुपये प्रति लिटरवर महागले आहे. कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 95.07 आणि WTI प्रति बॅरल $ 88.74 पर्यंत वाढली आहे. (Petrol Diesel Price In India)

४ महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

- मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

- कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

SCROLL FOR NEXT