शिंदेंची सेनाच खरी, दसरा मेळाव्याची परवानगी त्यांनाच मिळाली पाहिजे : रामदास आठवले

'उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही'
Ramdas Athavale On Shivsena Dasara Melava
Ramdas Athavale On Shivsena Dasara Melava Saam TV
Published On

Ramdas Athavale On Shivsena Dasara Melava : खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचीच आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला त्यांनाच परवानगी मिळाली पाहिजे, उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला. (Ramdas Athavale Today News)

Ramdas Athavale On Shivsena Dasara Melava
Amit Shah : एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना; अमित शाह काय म्हणाले? वाचा...

रामदास आठवले (Ramdas Athavale) हे आज कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका खाजगी कामानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी दसरा मेळावाबाबत बोलताना आपले मत मांडले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला देखील लगावला. रिक्षा चालकांनी शिवसेना वाढवलेली आहे. त्यांचा अपमान करणे हे योग्य नाही, असं म्हणत आठवले यांनी शिंदे गटाची बाजू घेतली.

शिवसेनेचे दोन तृतीअंश आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने दसरा मेळावा घेण्याची त्यांनाच परवानगी द्यावी, रिक्षा चालकांनी शिवसेना वाढवलेली आहे. त्यांचा अपमान करणे हे योग्य नाही, असंही रामदास आठवले म्हणाले. (Shivsena Uddhav Thackeray vs Eknath Shinde)

Ramdas Athavale On Shivsena Dasara Melava
Amit Shah : उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आली; अमित शाहांचा घणाघात

इतकंच नाही तर खरी शिवसेना एकनाथ शिंदेची आहे, त्यामुळे दसरा मेळाव्याची त्यांनाच परवानगी मिळाली पाहिजे. तर उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही. असा टोला देखील रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर भाजपाचं नुकसान होऊ शकतं, त्यांच्यामुळे गुजराती, उत्तर भारतीय तसेच दक्षिण भारतीयांची मते आपल्याला मिळणार नाहीत. त्यामुळे आपला तोटा होऊ शकतो, महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपासोबत आहे, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com