Petrol Diesel Price Today, Crude Oil Price Today, Petrol Price In India, Diesel Price In India Maharashtra Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Price : सलग दुसऱ्या दिवशी कच्चा तेलाचे दर घसरले; पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या 24 तासांत प्रति बॅरल सुमारे तीन डॉलरने घसरल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या 24 तासांत प्रति बॅरल सुमारे तीन डॉलरने घसरल्या आहेत. याचा परिणाम गुरुवारी सकाळी देशांतर्गत बाजारात पेट्रोल Petrol) आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर झाला. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी उत्तरप्रदेशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. तर बिहारमध्ये इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. (Petrol Diesel Price In Mumbai)

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल 35 पैशांनी 96.65 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 32 पैशांनी 89.82 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोलचा दर 13 पैशांनी घसरून 96.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 12 पैशांनी घसरून 89.64 रुपये प्रति लिटर झाला आहे.

दुसरीकडे, मुंबई दिल्लीसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याव्यतिरिक्त बिहारची राजधानी पटनामध्ये आज पेट्रोलचा दर 21 पैशांनी वाढून 107.80 रुपये प्रति लीटर झाला आहे, तर डिझेल 20 पैशांनी वाढून 94.56 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.

गेल्या 24 तासात कच्च्या तेलाच्या किंमती प्रतिबॅरेल 3 डॉलर्सनी घसरल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिडॉलर 2.95 ने घसरून प्रति बॅरल 85.41 डॉलरवर पोहोचली आहे. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT