Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Prices : पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त होणार?, जाणून घ्या आजचे इंधनाचे भाव

देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : इंधन दरवाढीत होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमती कमी होण्याची शक्यता आहे. शनिवारी विमान इंधनाच्या (ATF) किमती 2 टक्क्यांहून अधिक कमी झाल्या. दुसरीकडे, कच्च्या तेलाचा (Crud Oil) भाव अनेक दिवसांपासून प्रतिबॅरेल 100 डॉलरच्या आसपास आहे. गेल्या आठवडाभरापासून त्याचे दरही कमी होताना दिसत आहेत. अशा स्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही घट होण्याची शक्यता आहे. (Petrol Diesel Price Today)

तज्ञांचे म्हणणे आहे की जर कच्चे तेलाचे दर 100 डॉलरच्या जवळ राहिले तर पेट्रोल डिझेलचे दर आणखी कमी होऊ शकतात. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या सततच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दरही जाहीर केले आहेत, ज्यामध्ये रविवारीही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी त्याच्या किमती वाढवल्या नाहीत, तर क्रूडच्या किमती एकदा प्रति बॅरल 140 डॉलरच्या वर गेल्या होत्या. आता क्रूड 100 डॉलरच्या जवळ असताना, आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. (Petrol Diesel Prices Cut In Maharashtra)

4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - पेट्रोल 106.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.28 रुपये प्रति लीटर.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT