Petrol Diesel Price Saam Tv
देश विदेश

Fuel Price : पेट्रोल-डिझेलच्या किमती 5 रुपयांनी कमी होऊ शकतात; काय आहे कारण?

गेल्या 10 महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत 35 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महागाईने त्रस्त नागरिकांना काहीशी दिलासादायक बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. क्रूड ऑइलच्या किमतीत 35 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. तज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती येत्या काळात आणखी खाली येण्याची शक्यता आहे. याचा परिणाम भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) किमतीवर होऊ शकतो. एका अंदाजानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 5 रुपयांची घसरण होऊ शकते.

गेल्या 10 महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत 35 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली आहे. 7 मार्च रोजी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 139.13 डॉलरवर होती. जी आज प्रति बॅरल 87.81 डॉलरवर आली आहे. (Latest News Update)

टीव्ही 9 हिंदीच्या वृत्तानुसार, IIFL चे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले की, आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घसरण होऊ शकते. ही घट प्रति बॅरल 5 डॉलरपेक्षा जास्त असू शकते. यासाठी त्यांनी काही कारणे देखील दिली आहेत. एकतर जगातील मोठ्या कंपन्या वर्षाच्या अखेरीस त्यांचे जुने हेज फंड लिक्विडेट करण्याचा विचार करतात. त्यामुळे तेलाची मागणी कमी होते. तसेच अमेरिकेत स्टॉक आणि शेल्समध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठाही वाढल्याने येत्या काही दिवसांत दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

आणखी कारण म्हणजे चीनमध्ये कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वाढला आहे. त्यामुळे कोविडची नवी लाट येण्याची भीती जगातील सर्व अर्थव्यवस्थांना आहे. यामुळे देखील मागणी सातत्याने कमी होत आहे. तर अलीकडेच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले होते की आता ते त्यांच्याच देशात कच्च्या तेलासाठी ड्रिलिंग वाढवतील. हे पाहून युरोपातील इतर देशांनीही ड्रिलिंग वाढवले ​​आहे, त्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता वाढली आहे.

भारतावर याचा काय परिणाम होईल तर आपल्या गरजेच्या 85 टक्के कच्च्या तेलाची आपण आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याचा परिणाम भारतात स्पष्टपणे दिसून येईल. अनुज गुप्ता म्हणाले की, येत्या दोन आठवड्यात ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 82 डॉलरवर आली तर देशात पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रति लिटर 5 रुपयांनी कमी होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT