Petrol Diesel Price Drop Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price Drop: मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने केली मोठी कपात

Petrol Diesel Price Drop News: लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Satish Kengar

Petrol Diesel Price Drop News:

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात कमी झालेल्या किमती लागू होतील. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

हरदीप सिंह पुरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ''पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2 रुपयांनी कमी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, आपल्या कोट्यवधी भारतीयांच्या कुटुंबाचे कल्याण आणि सुविधा हे त्यांचे नेहमीच ध्येय आहे.''   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हरदीप सिंह पुरी यांनी पुढे लिहिले की, "जग कठीण काळातून जात असताना विकसनशील देशांमध्ये पेट्रोलच्या किमती 50-72 टक्क्यांनी वाढल्या होत्या आणि आपल्या आजूबाजूच्या अनेक देशांमध्ये पेट्रोल मिळणेही बंद झाले होते.तेलाचे सर्वात मोठे संकट असूनही 1973 पासून पन्नास वर्षांत मोदींचे कुटुंब त्यांच्या दूरदर्शी आणि अंतर्ज्ञानी नेतृत्वामुळे प्रभावित झाले नाही. भारतातील पेट्रोलचे दर वाढण्याऐवजी गेल्या अडीच वर्षांत 4.65 टक्क्यांनी कमी झाले आहेत.  (Latest Marathi News)

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी गेल्या 7 दिवसात दोन निर्णय घेतले आहे. याआधी 8 मार्च महिला दिनानिमित्त एलपीजी गॅस 100 रुपयांनी स्वस्त केला होता आणि आज आचारसंहिता लागण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेल प्रतीलिटर 2 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. या नवीन किंमत शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात लागू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT