Petrol Diesel Latest Price
Petrol Diesel Latest Price Saam tv
देश विदेश

Petrol Diesel : महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Shivani Tichkule

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत वाढत होत असताना यामध्ये सोमवारी काहीशी घसरण दिसून आली. आज जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 97.74 डॉलर इतकी आहे, तर WTI प्रति बॅरल 92.34 डॉलरवर पोहोचले आहे. इथे देशातील सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर केले आहेत. देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये दरात कोणतीही वाढ झालेली नाही. (Petrol Diesel Latest Price In Marathi)

महाराष्ट्रात पेट्रोल 0.49 रुपयांनी घसरून 106.36 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 0.45 रुपयांनी घसरून 92.88 रुपये प्रति लिटर झाले आहे. मध्य प्रदेशातही पेट्रोल 0.27 रुपयांनी घसरून 109.43 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 0.24 रुपयांनी घसरून 95 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. उत्तर प्रदेशबद्दल बोलायचे झाले तर येथे आज पेट्रोल 0.28 पैशांनी घसरून 96.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.52 रुपये प्रति लीटर झाले आहे. याशिवाय गुजरात, झारखंडसह इतर काही राज्यांमध्ये इंधनाच्या दारात वाढ झाली आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. (Petrol Diesel Price Today)

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mulund BJP News | पैसे वाटल्याचा आरोप, भाजप आणि ठाकरे गटाचा राडा

Umbrella and Raincoat Shopping : पावसाळ्याच्या शॉपिंगसाठी मुंबईतील खास मार्केट; छत्री आणि रेनकोट फक्त २५० रुपयांत!

Kolhapur: बेकायदेशीर गर्भपात केल्याचा संशय, काेल्हापुरात डॉक्टर अटकेत; दाेघांकडून गर्भलिंग निदानाचे साहित्य जप्त

Solapur Crime: दारु पिऊन आईला शिवीगाळ केल्याचा राग, मित्रांनी केलेल्या जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू; सोलापूर हादरलं

Nashik Lok Sabha: आज प्रचाराचा शेवटचा दिवस; नाशिकमध्ये प्रचार सभांचा धुराळा, शांतिगिरी महाराजांचं जोरदार शक्ती प्रदर्शन

SCROLL FOR NEXT