Petrol Diesel Latest Price Saam tv
देश विदेश

Petrol Diesel: आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

जाणून घ्या प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण सुरूच आहे. कच्च्या तेलाचे दर गेल्या 3 महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात 30-35 डॉलरने स्वस्त झाला आहे. सध्या ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 86 डॉलरच्या आसपास आहे. मात्र तरीही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही दिलासा मिळालेला नाही. केंद्र सरकारने शेवटच्या वेळी 21 मे रोजी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवरील (Diesel) उत्पादन शुल्क कमी केले होते.

कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण

ब्रेंट क्रूड तेल सध्या प्रति बॅरल 86 डॉलरच्या आसपास आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत प्रति बॅरल 78 डॉलरवर पोहोचली आहे अशा स्थितीत कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 80.85 डॉलर पर्यंत जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या 4 महिन्यांपासून स्थिर आहेत. केंद्र सरकारने (Central Government) 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. यानंतर लगेचच काही राज्य सरकारांनीही व्हॅट कमी केला

आजचे भाव काय आहेत?

– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

– बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

– जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

– पोर्टब्‍लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

– पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

– चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 आणि डिझेल डीजल 96.52 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : दिवाळी-दसऱ्यात दिवाळं निघणार, सोनं ५० हजारांनी महागणार; तज्ज्ञांच्या अंदाजाने सराफा बाजारात खळबळ

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Manoj Jarange Exclusive : मला मारण्याचं षडयंत्र रचलंय; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

Dhananjay Munde : मोठी बातमी! धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?

Saree Draping : डाव्या की उजव्या? साडीचा पदर कोणत्या बाजूला काढावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT