Petrol Diesel Price Today  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel: पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

आज किती रुपयांनी कमी झाले पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जागतिक बाजारात गेल्या २४ तासांत कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे एक डॉलरची वाढ झाली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किरकोळ दरात बदल करण्यात आला आहे. यूपीपासून बिहारपर्यंत अनेक शहरांमध्ये कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या आहेत, तर नोएडा- ग्रेटर नोएडामध्ये त्याच्या किमती वाढल्या आहेत. (Petrol Price Today)

आजही सरकारी तेल कंपन्यांनी दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आज जाहीर झालेल्या दरानुसार, गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) येथे पेट्रोल 35 पैशांनी महागले असून 97 रुपये झाले आहे आणि डिझेल 32 पैशांनी महागले असून 90.14 रुपये प्रति लिटर झाले आहे.

मात्र, यूपीची राजधानी लखनऊमध्ये आज पेट्रोल 13 पैशांनी घसरून 96.44 रुपये आणि डिझेल 12 पैशांनी घसरून 89.64 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये पेट्रोल 56 पैशांनी 107.24 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 52 पैशांनी 94.64 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतीय महिलांना लग्न का करू वाटत नाहीये? नातेसंबंधाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन का बदललाय?

Maharashtra News Live Update: विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते 22 व्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन

Ramayana collection : भारतात 1००० कोटींची कमाई करणारा बॉलिवूडचा दुसरा चित्रपट; बॉक्स ऑफिसवर २३ व्या दिवशी किती जमवला गल्ला?

Winter Chilblains : थंडीमध्ये हात-पायांना खाज, जळजळ आणि सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात

30 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT