Petrol Diesel
Petrol Diesel Saam TV
देश विदेश

Petrol Diesel : यूपी-बिहारसह 'या' राज्यात पेट्रोल- डिझेल स्वस्त; महाराष्ट्रात आजचा भाव काय? जाणून घ्या...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - गेल्या २४ तासांत जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी जारी केलेल्या ताज्या दरात यूपी आणि बिहारमधील (Bihar) अनेक शहरांमध्ये इंधनाच्या (Petrol) किमतीत घट झाली आहे. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल झालेला नाही. (Petrol Diesel Latest Price Update)

सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, यूपीच्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल 35 पैशांनी घसरून 96.65 रुपये आणि डिझेल 32 पैशांनी घसरून 89.82 रुपये प्रति लिटर झाले आहे.

याशिवाय, यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोलची किंमत 1 पैशांनी कमी होऊन 96.57 रुपये प्रति लीटर झाली आहे, तर डिझेलची किंमत 1 पैशांनी घसरून 89.76 रुपये प्रति लीटर झाली आहे. आज बिहारची राजधानी पाटणामध्येही पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. येथे पेट्रोल 82 पैशांनी घसरून 107.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 77 पैशांनी घसरून 94.09 रुपये प्रति लिटर इतके झाले आहे.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

J P Nadda : भाजप आता स्वत:च स्वत:ला चालवू शकतो; RSSच्या प्रश्नावर जे.पी.नड्डा यांचं वक्तव्य

Sonalee Kulkarni : पत्रकार ते अभिनेत्री; सिनेसृष्टीतील 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीचा इंडस्ट्रीतील थक्क करणारा प्रवास

Gurucharan Sinh News | तारक मेहता फेम अभिनेते गुरुचरण सिंह परतले

Health Tips Water : तहान नसतानाही पाणी पिणे ठरू शकते आरोग्यासाठी घातक

Mulund BJP News | पैसे वाटल्याचा आरोप, भाजप आणि ठाकरे गटाचा राडा

SCROLL FOR NEXT