Petrol Diesel Latest Price Saam TV
देश विदेश

Petrol Diesel : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी एकदा पेट्रोल-डिझेलचे दर तपासा

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

Petrol Diesel Latest Price : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असून ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल 90 डॉलरच्या जवळ पोहोचली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किरकोळ दरातही वाढ दिसून येत असून आज अनेक शहरांमध्ये इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये दर स्थिर आहेत.

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी हरियाणाच्या गुडगावमध्ये पेट्रोल 2 पैशांनी महाग होऊन 96.99 रुपये प्रति लिटर झाले, तर डिझेल 2 पैशांनी वाढल्यानंतर 89.86 रुपये प्रति लिटरवर विकले गेले.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोल 36 पैशांनी वाढून 108.44 रुपये प्रति लिटर तर डिझेल 32 पैशांनी वाढून 93.68 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये पेट्रोलचा दर 4 पैशांनी वाढून 107.80 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेल 4 पैशांनी वाढून 94.56 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT