Petrol Diesel Prices
Petrol Diesel Prices Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price Today: आज महाराष्ट्रात किती रुपयांना मिळणार पेट्रोल-डिझेल? एका क्लिकवर झटपट चेक करा आजचे दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Rates: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज थोडीशी घसरण झाली आहे. WTI क्रूड 0.27 टक्क्यांनी घसरून 72.96 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.31 टक्क्यांच्या घसरणीसह 76.77 डॉलरवर विकले जात आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर केले जातात. Latest Marathi News)

देशातील बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही चढ-उतार झालेला नाही. महाराष्ट्रात पेट्रोल 40 पैशांनी तर डिझेल 39 पैशांनी महागलं आहे. त्याचबरोबर तामिळनाडूमध्येही पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) 25 पैशांनी महागले आहे. केरळमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. तर तेलंगणामध्ये इंधन स्वस्त झाले आहे. त्याचवेळी, उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : धाराशिवमध्ये प्रकाश आंबेडकर यांची आज जाहीर सभा

Bhiwandi Constituency: भिवंडी मतदारसंघात राजकारण तापलं, काॅंग्रेस नेते दयानंद चोरगे उमेदवारी अर्ज दाखल करणार?

Commuters Falls From Train : लोकलगर्दीचे बळी! ५ दिवसांत ३ प्रवाशांचा ट्रेनमधून पडून मृत्यू

Nashik News: हृदयद्रावक! खेळता खेळता तलावात पडले, बहीण भावाचा करुण अंत; नाशिक हळहळलं

Navi Mumbai News : अतिरिक्त फी न भरल्याने दीड हजार विद्यार्थ्यांचे निकाल थांबवले; संतप्त पालकांनी गाठले पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT